गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

Published:September 2, 2022 05:58 PM2022-09-02T17:58:55+5:302022-09-02T18:02:51+5:30

Easy Rangoli Designs for Gauri Ganpati : झटपट काढता येतील असे रांगोळ्यांचे डिझाइन्स आपल्या डोळ्यासमोर असतील तर आपले एक काम सोपे होऊन जाते.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

गौरी गणपती म्हटले की त्यासमोर आणि दारात रांगोळी काढणे ओघानेच आले. हल्ली नियमित रांगोळी काढायची सवय गेल्याने सणावाराला कोणती, कशी रांगोळी काढू असा प्रश्न अनेकींना पडतो. अशावेळी झटपट काढता येतील असे रांगोळ्यांचे डिझाइन्स आपल्या डोळ्यासमोर असतील तर आपले एक काम सोपे होऊन जाते. पाहूयात अशाच काही सुबक रांगोळी डिझाइन्स (Easy Rangoli Designs for Gauri Ganpati).

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

गौरी म्हणजे माहेरवाशीण त्यामुळे गौरी बसतात त्यादिवशी साजेसे असे सौभाग्याचे अलंकार रांगोळीत काढायचे असतील तर अशाप्रकारची रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

गौरी आणि गणपती मिळून एखादी मोठी रांगोळी काढायची असेल आणि तुमच्या हॉलमध्ये किंवा दारासमोर मोठी जागा असेल तर अशाप्रकारची रांगोळी तुम्ही काढू शकता.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

सोपी, लहान पण ठसठशीत अशी रांगोळी काढायची असेल तर कमीत कमी रंग वापरुन पण उठून दिसेल अशी ही रांगोळी तुम्ही ट्राय करु शकता. गौरीसमोर किंवा दारातही दिवे लावलेली ही रांगोळी संध्याकाळच्या वेळी अतिशय सुंदर दिसते.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

बरेचदा दारात आणि गौरी-गणपतीसमोर रांगोळी काढायला पुरेशी जागा नसते. किंवा सणावाराला आपल्याकडे जेवायला बरीच मंडळी येतात. अशावेळी ताटाभोवती काढता येईल अशी थोडी लहानशी रांगोळी काढायची असेल तर त्यात बऱ्याच डिझाइन्स काढता येतात.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

कमीत कमी कष्टात पण देखणी रांगोळी काढायची तर असे काही प्रयोग तुम्ही नक्कीच करु शकता. मात्र यासाठी तुमचं डोकं शांत असण्याची आवश्यकता असते आणि तुमच्याकडे थोडी कलात्मकताही असावी लागते.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

गौराई म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीच्या पावलांनीच त्या आपल्या घरी येतात. या गौराईंचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला छानशी रांगोळी काढायची असेल तर गणपती आणि गौरी या दोन्हीसाठी मिळून रांगोळीचे अशाप्रकारचे तोरण तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता.

गौरीसमोर काढा सुबक रांगोळ्या; झटपट काढता येतील अशा सोप्या ८ डिझाइन्स...

एखाद्या टेबलवर, फरशीवर झटपट रांगोळी काढायची असेल तर बाप्पाची अशी आऊटलाईन करुन तुम्ही त्याला वेगवेगळ्या रंगाने सजवू शकता. त्यामुळे वेळ तर वाचतोच पण रांगोळीही सुंदर दिसते.