Join us   

Dussehra 2024 : दसऱ्याला दारासमोर सुंदर रांगोळ्या; ५ मिनिटांत काढून होईल सुबक-सुंदर डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:10 PM

1 / 10
दसऱ्याच्या सण (Dussehra 2024) म्हणजेच विजयादशमी संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या सणाच्या दिवशी अनेकांच्या दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. दसऱ्यासाठी सुंदर, सुबक रांगोळी तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काही सोप्या स्टेप्स वापरू शकता.
2 / 10
दसऱ्याची रांगोळी काढणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्ही विविध रंगाचा वापर करू शकता किंवा फुलं आणि पानांची रांगोळीसुद्धा काढू शकता.
3 / 10
रांगोळीनं हॅप्पी दसरा किंवा दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा असं लिहिल्यास दाराची शोभा अधिक वाढेल.
4 / 10
तुम्ही हिरव्या आणि पोपटी रंगाची मदत घेत आपट्याचं पानंसु्दधा काढू शकता.
5 / 10
काहीजण दसऱ्याच्या रांगोळीत धनुष्यबाण काढणं पसंत करतात.
6 / 10
हॅप्पी दसरा असं रांगोळीवर लिहून तुम्ही आजूबाजूला फुलं काढू शकता.
7 / 10
एक गोल काढून आजूबाजूला पानं, फुलं काढा आणि त्यात शुभ, लाभ लिहा.
8 / 10
रांगोळीमध्ये देखील फुलांचे तोरण दाखवता येते. ते खूपच सुंदर दिसते.
9 / 10
सररस्वतीची सोपी रांगोळी तुम्हाला काढता येईल. त्यासाठी आधी खडूने तुम्ही सरस्वती काढू शकता.
10 / 10
हॅप्पी दसरा अशी रांगोळी काढून वर बाण काढला तर रांगोळीला अधिक शोभा येईल.
टॅग्स : रांगोळीसोशल व्हायरल