या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

Updated:April 7, 2025 13:57 IST2025-04-07T13:50:30+5:302025-04-07T13:57:56+5:30

Even gold pales in comparison to the beauty of this flower : केसात गजरा माळायला आवडत असेल तर, हा गजरा माहितच हवा. पाहा किती सुंदर आहे हे फुल.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

लग्न समारंभात किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाताना आपण छान तयार होऊन जातो. गळ्यात, हातात, कानात छान दागिने घालतो. साडी नेसतो किंवा मस्त ड्रेस घालतो.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

आणखी एक गोष्ट आहे जी महिलांचे सौंदर्य वाढवते. ती म्हणजे गजरा. केसामध्ये गजरा माळल्यावर रुप काही वेगळेच दिसते. आंबाडा असो किंवा वेणी त्यावर ताज्या फुलांचा छान असा गजरा माळायचा. फार सुंदर दिसतो.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

अनेकविध फुलांचा गजरा केसात माळण्यासाठी वापरला जातो. नुसते फुलही केसात माळले जाते. सगळ्या प्रकारचे गजरे छानच वाटतात. मात्र ओऊन केलेल्या गजऱ्याची बात काही औरच आहे.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

असाच एक मस्त दिसणारा गजरा म्हणजे सुरंगीचा. या सुंदर फुलाबद्दल अनेकांना माहितीच नसते. कारण फार कमी ठिकाणी या फुलांची झाडे आढळून येतात. शिवाय फुल मार्केटमध्येही हा प्रकार फार दिसत नाही.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

सुरंगी कोकणामध्ये जास्त प्रमाणावर आढळून येते. समुद्राजवळ सुरंगीची झाडे असतात. सुरंगीचा वास फारच मनमोहक असतो. सौंदर्य प्रसाधने तयार करतानाही त्यामध्ये हे फुल वापरले जाते.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

मार्चच्या सुमारास ही फुले छान फुलायला लागतात. पुढे दोन ते तीन महिने सुरंगीचे झाड छान बहरलेले असते. आजूबाजूलाही सुगंध पसरलेला असतो.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

सुरंगीच्या फुलांना सोन्याची फुले अशी उपमा दिली जाते. कारण ती सोनेरी रंगाची असतात. पांढरा व सोनेरी या दोन्ही तेजस्वी रंगांच्या मिश्रणातून तयार होणारे हे फुल फार मोहक दिसते.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

गुजरात, कोलकाता तसेच इतरही काही ठिकाणी कोकणातून या फुलांची निर्यात केली जाते. सुगंधी अत्तर तयार करण्यासाठी तसेच काही मसाले तयार करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो.

या फुलाच्या गजऱ्यासमोर सोनेही पडते फिके! सुगंधानं वेड लावणारं चमचमतं सोनं माळा केसात..

सुरंगीचा गजरा कळ्या खुलण्याआधीच तयार केला जातो. फुलाच्या देठाला दोरा गुंफून हा गरजा तयार करतात. तयार करायला जरा किचकटच आहे. मात्र दिसायला तेवढाच सुंदरही आहे.