1 / 8१६ जून रोजी जगभर फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय, पण काय करावं, ते नेमकं सुचत नसेल तर या घ्या काही छान आयडिया...2 / 8१६ जून रोजी जगभर फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय, पण काय करावं, ते नेमकं सुचत नसेल तर या घ्या काही छान आयडिया...3 / 8आजवर आपल्या आवडीनिवडी आपल्या वडिलांनी जपल्या. आपल्याला आवडणारे सगळे पदार्थ आपल्याला भरभरून दिले. आता त्यांची पाळी. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या ठिकाणाहून आवडीचे पदार्थ आणा आणि त्यांच्यासोबत त्या पदार्थांचा आस्वाद घ्या.. किंवा त्यांना घेऊन बाहेर जा.4 / 8वडिलांना त्यांच्या आवडीच्या एखाद्या नाटक- सिनेमाला घेऊन जा. त्यांना नक्की छान वाटेल. 5 / 8वडिलांसाठी छान एक दिवसीय सहलीचे आयोजन करा. त्यानिमित्त सगळ्यांनाच एकमेकांसोबत घालवायला थोडा वेळ मिळेल आणि बाबांना त्यांच्या रुटीनमधून थोडा चेंज.6 / 8वडिलांच्या आयुष्यातील आतापर्यंतचे जे काही खास क्षण आहेत त्या फोटोंचे कलेक्शन करून त्याची एक छान फोटोफ्रेम तयार करून ती वडिलांना द्या.. असे सगळे खास क्षण एकाचवेळी बघण्याचा आनंद काही वेगळा असतो. 7 / 8वडिलांच्या आयुष्यातील आतापर्यंतचे जे काही खास क्षण आहेत त्या फोटोंचे कलेक्शन करून त्याची एक छान फोटोफ्रेम तयार करून ती वडिलांना द्या.. असे सगळे खास क्षण एकाचवेळी बघण्याचा आनंद काही वेगळा असतो. 8 / 8अशी एखादी वस्तू नक्कीच असते जी वडिलांना मनापासून आवडते, पण ती त्यांच्याकडे नसते. काही ना काही कारणांमुळे ती वस्तू घेणं नेहमी राहून जातं. असं काही तुमच्या वडिलांच्या बाबतीत शोधून काढा आणि त्यांना ती वस्तू घेऊन द्या..