दिवाळीत 'ही' फुलं वापरून करा सुंदर फ्लॉवर डेकोरेशन, ५ आकर्षक डिझाईन्स- घरभर दरवळेल फुलांचा सुगंध By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 4:04 PM 1 / 7दिवाळीमध्ये आपण दारासमोर रांगोळी तर नेहमीच काढतो. पण त्याऐवजी काही फुलं वापरून सुंदर फ्लॉवर डेकोरेशनही करू शकतो. यामुळे नक्कीच तुमच्या घराची सजावट इतरांपेक्षा जास्त आकर्षक आणि सुंदर वाटेल.2 / 7दिवाळीत झेंडू, शेवंती ही फुलं बाजारात भरपूर प्रमाणात असतात. त्यांचा वापर मरून अशी आकर्षक पुष्परचना करता येईल.3 / 7तुम्हाला जर कमळाचं फुल मिळालं तर त्याचा वापर करून अशी छानशी रचना करता येईल. घराच्या मुख्य द्वाराशी तुम्ही अशी रचना करून ठेवू शकता. 4 / 7दिवाळीत आपण घरभर पणत्या लावतो. त्या नुसत्याच जमिनीवर ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीची रचना करून ठेवल्यास ते अधिक आकर्षक वाटेल. यासाठी तुम्ही मोगरा, जाई, जुई, कुंदा अशी फुलं वापरू शकता. 5 / 7गुलाबाच्या पाकळ्या वापरून यासारख्या अनेक आकर्षक डिझाईन्स करता येऊ शकतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा गर्द गुलाबी रंग नेहमीच पाहणाऱ्याच्या नजरेला सुखावणारा असतो. 6 / 7तुमच्याकडे कमळ, गुलाब, झेंडू, शेवंती अशी सगळीच फुलं भरपूर प्रमाणात असतील तर अशा पद्धतीचं छानसं डिझाईन काढू शकता. 7 / 7चाफ्याची फुलं, विड्याची पानं यांचा रांगोळीमध्ये किती सुंदर उपयोग करता येतो पाहा.. त्याच्या जोडीला तर आकर्षक झेंडू आहेच.. आणखी वाचा Subscribe to Notifications