कृष्णवर्णीय तरुणीने केले भारतीय पद्धतीने लग्न, सुंदर-साजिरे रुप झाले व्हायरल! पाहा फोटो
Updated:March 18, 2025 14:52 IST2025-03-18T14:45:06+5:302025-03-18T14:52:14+5:30
foreigner girl gets married in Indian style, beautiful and elegant look goes viral! See photos : विदेशी नवरीचा देसी पेहराव. सुंदर व साधे रुप झाले व्हायरल.

इस्कॉनसारख्या धार्मिक संस्था जगभरात आहेत. अनेक परदेशी लोक आहेत जे भारतीय मान्यता आत्मसात करतात.
वृंदावन सारख्या ठिकाणी अनेक विदेशी लोक त्याचा देश व धर्म सोडून संन्यास घेण्यासाठी येतात. तसेच भारतीय संस्कृतीनुसार जगतात.
सध्या सोशल मिडियावर अशीच एक कॅरेबियन महिला फार चर्चेत आहे. तिने भारतीय हिंदू सनातन धर्मानुसार लग्न केले. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
या महिलेचे नाव श्यामा असे आहे. ती एक कृष्ण भक्त आहे. इस्कॉनची फॉलोवरसुद्धा आहे.
तिला तिच्या पेहरावामुळे राधा रानी अशी उपमा नेटकऱ्यांनी दिली आहे. हळदीपासून फेऱ्यांपर्यंत सर्व विधी तिने अगदी पारंपारिक पद्धतीने केले.
हळदीसाठी तिने घातलेला पिवळा अनारकली ड्रेस तिला फार सुंदर दिसत होता. तिने फुलांची ओढणी गळ्याभोवती घेतली होती.
लग्नाच्या मुख्य विधींसाठी तिने बनारसी लाल साडी आणि सोन्याचे भारतीय पद्धतीचे दागिने तिने घातले होते. तिला त्या लूकसाठी प्रचंड प्रेम मिळत आहे.
लग्न समारंभात इस्कॉनकडून किर्तनही आयोजित करण्यात आले होते. त्या किर्तनावेळी श्यामाने पांढरा घागरा घातला होता आणि कपाळाला टिळा लावला होता.
तिचे रुप सुंदर आणि साधे असे असल्याने सर्वांनाच ते फार आवडले. भारतीय पद्धतीने लग्न केल्याबद्दल भारतीयांना श्यामाचे फारच कौतुक वाटत आहे.