Join us

कृष्णवर्णीय तरुणीने केले भारतीय पद्धतीने लग्न, सुंदर-साजिरे रुप झाले व्हायरल! पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 14:52 IST

1 / 9
इस्कॉनसारख्या धार्मिक संस्था जगभरात आहेत. अनेक परदेशी लोक आहेत जे भारतीय मान्यता आत्मसात करतात.
2 / 9
वृंदावन सारख्या ठिकाणी अनेक विदेशी लोक त्याचा देश व धर्म सोडून संन्यास घेण्यासाठी येतात. तसेच भारतीय संस्कृतीनुसार जगतात.
3 / 9
सध्या सोशल मिडियावर अशीच एक कॅरेबियन महिला फार चर्चेत आहे. तिने भारतीय हिंदू सनातन धर्मानुसार लग्न केले. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
4 / 9
या महिलेचे नाव श्यामा असे आहे. ती एक कृष्ण भक्त आहे. इस्कॉनची फॉलोवरसुद्धा आहे.
5 / 9
तिला तिच्या पेहरावामुळे राधा रानी अशी उपमा नेटकऱ्यांनी दिली आहे. हळदीपासून फेऱ्यांपर्यंत सर्व विधी तिने अगदी पारंपारिक पद्धतीने केले.
6 / 9
हळदीसाठी तिने घातलेला पिवळा अनारकली ड्रेस तिला फार सुंदर दिसत होता. तिने फुलांची ओढणी गळ्याभोवती घेतली होती.
7 / 9
लग्नाच्या मुख्य विधींसाठी तिने बनारसी लाल साडी आणि सोन्याचे भारतीय पद्धतीचे दागिने तिने घातले होते. तिला त्या लूकसाठी प्रचंड प्रेम मिळत आहे.
8 / 9
लग्न समारंभात इस्कॉनकडून किर्तनही आयोजित करण्यात आले होते. त्या किर्तनावेळी श्यामाने पांढरा घागरा घातला होता आणि कपाळाला टिळा लावला होता.
9 / 9
तिचे रुप सुंदर आणि साधे असे असल्याने सर्वांनाच ते फार आवडले. भारतीय पद्धतीने लग्न केल्याबद्दल भारतीयांना श्यामाचे फारच कौतुक वाटत आहे.
टॅग्स : लग्नफॅशनभारतसांस्कृतिकहिंदू