करीना-करिश्मा ते रणबीर कपूर, खवय्या कपूर कुटूंबातले पाहा आगळे पदार्थ- कुणाला काय आवडते?
Updated:March 27, 2024 17:16 IST2024-03-27T16:43:56+5:302024-03-27T17:16:41+5:30

हिंदी चित्रपट सृष्टीवर राज्य करणाऱ्या कपूर परिवारातील बहुतांश सदस्य खवय्ये आहेत. आता कामाचा भाग म्हणून प्रत्येकालाच हेल्थ कॉन्शस असण्याची गरज असली तरी आवडते पदार्थ समोर आल्यानंतर मात्र ते त्याच्यावर चांगलाच ताव मारतात.
रणबीर कपूरपासून ते पृथ्वीराज कपूरपर्यंत कोणत्या कपूरला कोणता पदार्थ सर्वाधिक आवडतो, याची माहिती नुकतीच ई- टाईम्सने शेअर केली आहे.
रणबीर कपूर वडापाव प्रेमी आहे. वडापाव समोर आला की त्याला दुसरं काहीही नको असतं.
झीरो फिगरचा ट्रेण्ड बॉलीवूडमध्ये घेऊन येणारी अभिनेत्री करिना कपूर पिझ्झा समोर आल्यानंतर डाएट- फिटनेस असं सगळं काही विसरून जाते.
करिश्मा कपूरचा आवडीचा पदार्थ आहे बिर्याणी. बिर्याणी खायला मिळाली की करिश्मा नेहमीच खुश असते.
अभिनेते ऋषी कपूर यांना चायनिज खायला खूप आवडायचे. विशेषत: नूडल्स आणि त्यासोबत वेगवेगळे सूप ट्राय करणं ही त्यांची खास आवड.
शोमॅन राज कपूर यांना पाणीपुरी खायला खूप आवडायचं. ते म्हणे सायंकाळी त्यांच्या स्टुडियोतून बाहेर पडले की चेंभूरला त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन पाणीपुरी हमखास खायचे.
याखनी पुलाव (Yakhni Pulao) ही पृथ्वीराज कपूर यांची आवडती डिश होती. हा मुगलाई खाद्य संस्कृतीतला पदार्थ आहे.