Ganesh Jayanti Special Rangoli Designs : दारात, बाप्पासमोर काढण्यासाठी ८ सोप्या-आकर्षक रांगोळी डिझाईन्स
Updated:February 13, 2024 13:14 IST2024-02-13T13:09:37+5:302024-02-13T13:14:35+5:30
Ganesh Jayanti Special Rangoli Designs

गणेश जयंतीच्या निमित्ताने दारात किंवा बाप्पासमोर रांगोळी आवर्जून काढली जाते. काय काढावं समजत नसेल तर पाहा झटपट काढता येतील अशा सोप्या डिझाईन्स (Ganesh Jayanti Special Rangoli Designs )...
कमीत कमी वेळात आणि कष्टात अतिशय आकर्षक अशी रांगोळी काढायची असेल तर बाप्पाच्या चेहऱ्याची ही रांगोळी छान दिसते.
बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल रांगोळीमध्ये काढायचे असेल तर ही सोपी, सुटसुटीत रांगोळी काढू शकतो.
आकर्षक रंगसंगती करुन गणपती बाप्पासमोर रांगोळी काढल्यास आपल्यालाच अतिशय प्रसन्न आणि चांगले वाटते.
लहान मुलांना आपण सोप्या पद्धतीने गणपती काढायला शिकवतो त्याचप्रकारची अगदी साधी पण सुबक दिसणारी रांगोळी फार छान दिसते.
तुमच्याकडे थोडा वेळ आणि पेशन्स असतील तर अशाप्रकारची आकर्षक रांगोळी तुम्ही नक्की काढू शकता.
अगदी ५ मिनीटांत काढून होणारी ही गणपतीच्या चेहऱ्याची रांगोळी फारच सोपी पण तितकीच आकर्षक आहे. कमी जागेसाठी अशाप्रकारची रांगोळी चांगला पर्याय ठरु शकते.
थोडी जास्त जागा असेल आणि गणेश जयंतीचा मोठा उत्सव असेल तर नुसत्या रांगोळीपेक्षा पानाफुलांचा वापर करुन अशी रांगोळी काढू शकतो.