Ganesh Jayanti Special Rangoli Designs : दारात, बाप्पासमोर काढण्यासाठी ८ सोप्या-आकर्षक रांगोळी डिझाईन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 1:09 PM 1 / 8 गणेश जयंतीच्या निमित्ताने दारात किंवा बाप्पासमोर रांगोळी आवर्जून काढली जाते. काय काढावं समजत नसेल तर पाहा झटपट काढता येतील अशा सोप्या डिझाईन्स (Ganesh Jayanti Special Rangoli Designs )...2 / 8कमीत कमी वेळात आणि कष्टात अतिशय आकर्षक अशी रांगोळी काढायची असेल तर बाप्पाच्या चेहऱ्याची ही रांगोळी छान दिसते. 3 / 8बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल रांगोळीमध्ये काढायचे असेल तर ही सोपी, सुटसुटीत रांगोळी काढू शकतो. 4 / 8आकर्षक रंगसंगती करुन गणपती बाप्पासमोर रांगोळी काढल्यास आपल्यालाच अतिशय प्रसन्न आणि चांगले वाटते. 5 / 8लहान मुलांना आपण सोप्या पद्धतीने गणपती काढायला शिकवतो त्याचप्रकारची अगदी साधी पण सुबक दिसणारी रांगोळी फार छान दिसते.6 / 8तुमच्याकडे थोडा वेळ आणि पेशन्स असतील तर अशाप्रकारची आकर्षक रांगोळी तुम्ही नक्की काढू शकता. 7 / 8अगदी ५ मिनीटांत काढून होणारी ही गणपतीच्या चेहऱ्याची रांगोळी फारच सोपी पण तितकीच आकर्षक आहे. कमी जागेसाठी अशाप्रकारची रांगोळी चांगला पर्याय ठरु शकते. 8 / 8थोडी जास्त जागा असेल आणि गणेश जयंतीचा मोठा उत्सव असेल तर नुसत्या रांगोळीपेक्षा पानाफुलांचा वापर करुन अशी रांगोळी काढू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications