गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 4:21 PM 1 / 8गणपती बाप्पा वर्षभराने येणार म्हटल्यावर घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. या बाप्पाला विराजमान होण्यासाठी छान जागा, डेकोरेशन अशी सगळी तयारी केली जाते. दरवर्षी डेकोरेशन काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर झटपट करता येतील असे डेकोरेशनचे काही पर्याय पाहूया (Ganpati Ganesh Festival Easy Decoration Ideas)…2 / 8बाजारात हल्ली वेगवेगळ्या मटेरीयलपासून केलेले बरेच काही उपलब्ध असते. ते फक्त थोड्या कल्पक पद्धतीने अॅरेंज केले तर कमी वेळात चांगले डेकोरेशन करता येते. 3 / 8थोडी जागा असेल आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर खऱ्या फुलांचे डेकोरेशन करु शकतो. हे डेकोरेशन फारच सुंदर आणि नैसर्गिक दिसते. 4 / 8कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये एखादा जरी कल्पक व्यक्ती असेल तरी थोडा वेळ देऊन आगळेवेगळे काही करायचे असेलत तर अशाप्रकारचे ग्लास किंवा कार्डशीटचा वापर करुन बरेच प्रकार करता येतात. 5 / 8प्लॅस्टीकचा वापर करायचा नसेल तर लाकडी किंवा मातीच्या बेसचे पर्यावरणपूरक असे डेकोरेशन करणेही फार अवघड नसते. यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. 6 / 8फक्त ओढण्या किंवा रंगबिरंगी कापड आणि लायटींगच्या माळा यांचा वापर करुन सोपे आणि सुटसुटीत असा बॅकड्रॉप तयार करता येऊ शकतो. गौरी किंवा गणपती दोन्हीसाठी हे अतिशय चांगले दिसते. 7 / 8युट्यूबसारख्या माध्यमावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ उपलब्ध असतात. घरातील लहान मुलांना घेऊनही आपल्याला साध्या कार्डशीटच्या माध्यमातून अतिशय सुंदर असे डेकोरेशन तयार करता येऊ शकते. 8 / 8अतिशय नॅचरल आणि तरीही आकर्षक असे डेकोरेशन हवे असेल तर आपल्या आजुबाजूला असणाऱ्या झाडांची पाने, विटा, लहान आकाराची रोपं यांचा वापर करुन सुंदर डेकोरेशन तयार होते. आणखी वाचा Subscribe to Notifications