Join us   

गौरी उद्यावर आल्या तरी डेकोरेशनची तयारी नाही, घ्या सोप्या टिप्स, गौराई सजतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 3:05 PM

1 / 7
गणपती येऊन आता २ दिवस झाले, त्यामुळे त्यांची सरबराई करुन झाल्यावर आता आपल्या सगळ्यांचा मोर्चा वळतो ते गौरीच्या आगमनाकडे. रोजचे ऑफीस, घरातली धावपळ यामध्ये गौरीच्या डेकोरेशनला काय करायचे हे ठरले नसेल तर घरात उपलब्ध असणाऱ्या किंवा बाजारात सहज उपलब्ध होतील अशा गोष्टींपासून झटपट डेकोरेशन कसे करायचे ते पाहूया Gauri Decoration Idea Simple And Easy Decoration Ganpati Festival...
2 / 7
फुलांचे डेकोरेशन हे सगळ्यात सोपे आणि सुंदर दिसणारे असते. बाजारात वेगवेगळ्या रंगाची, आकाराची अनेक फुलं मिळतात. गोरीच्या मागे गोल, चौकोनी, अर्धगोल अशा आकारात या फुलांची कमान केलेली अतिशय छान दिसते. मागे छानशी भिंत किंवा एखादा पडदा घातला की झटपट डेकोरेशन होते.
3 / 7
आपल्या घरात लहान मूल असेल तर त्याची भांडीकुंडी, खेळण्यातले प्राणी अशा काही बाही वस्तू नक्की असतात. यामध्ये पितळ्याची भांडी, मातीची किंवा चिनी मातीची, काचेची लहान भांडी असतील तर डेकोरेशन खूप छान दिसते. आपल्या घरात डेकोरेशनसाठी किंवा आपल्या आजुबाजूला, नातेवाईंकाकडून आपल्याला यातील काीह ना काही नक्की मिळू शकते.
4 / 7
घरात एखादा पाळणा किंवा झोपाळा असेल तर त्यावरच्या गौरीही खूप छान दिसतात. पाळणा थोडा सजवला आणि त्याला बाजूने डेकोरेशन केले की त्यावरच्या उभ्या किंवा बसलेल्या गौरी उत्सवाची शोभा वाढवतात. हल्ली अनेकांच्या टेरेसमध्ये, एखाद्या खोलीत पाळणा असतोच.
5 / 7
डेकोरेशनचे काहीच तयार नसेल तर लायटींगच्या माळा हा डेकोरेशनसाठी एक उत्तम उपाय असतो. वेगवेगळ्या रंगाच्या आणि स्टाइलच्या माळा गौरीच्या आजुबाजूने, मागून लावल्या की गौरींना छान शोभा येते. यासाठी आपल्याकडे माळा लावण्याची थोडी कल्पनाशक्ती असेल आणि पुरेसे लाइटस असतील तर गौरी खुलून दिसतात.
6 / 7
. घरात वेगवेगळ्य़ा छान ओढण्या, साड्या, पडदे असतील तर त्यापासूनही आपल्याला थोडी कलाकारी करुन चांगले डेकोरेशन करता येऊ शकते.
7 / 7
तुम्हाला थोडे पर्यावरणपूरक असे काही करायचे असेल तर तुम्ही आपल्या आजुबाजूला असलेल्या झाडाच्या पानांपासून, खाली पडलेल्या काही फांद्यांचा वापर करुन डेकोरेशन करु शकता. यासाठी थोडा वेळ लागू शकेल पण हे डेकोरेशन सगळ्यात युनिक असेल.
टॅग्स : सोशल व्हायरलगणपतीगणेशोत्सव