गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

Published:August 24, 2022 12:30 PM2022-08-24T12:30:45+5:302022-08-25T16:53:59+5:30

Gauri Ganpati Festival Gauri Easy Sari Draping Steps : माहेरवाशीण म्हणून आलेल्या या गौरी जास्तीत जास्त देखण्या कशा दिसतील यासाठी महिलांची गडबड सुरू असते.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

गौरी-गणपती आल्यावर आपण डेकोरेशन, प्रसाद, पूजा या सगळ्याची तयारी करतो खरी. पण महिलांचे प्रश्न त्याहून थोडे वेगळे असतात. उभ्या गौरी असतील तर कमी जागेत त्या बसवायच्या, साडीचा पोत कोणताही असला तरी गौरींना छान चापून चोपून साडी नेसवायची हे एकप्रकारचे आव्हान असते (Gauri Ganpati festival Gauri Easy Sari Draping Steps)

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

माहेरवाशीण म्हणून आलेल्या या गौरी जास्तीत जास्त देखण्या कशा दिसतील यादृष्टीने महिलांचा प्रयत्न असतो. यासाठी साडी नेसवण्याच्या काही सोप्या स्टेप्स आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात आधी पदराच्या निऱ्या घालून त्या सेट करुन ठेवा. या सेट केलेल्या पदराला एखादी पीन लावून ठेवल्यास तो पदर हलणार नाही आणि सगळ्यात शेवटी नीट बसवता येईल.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

त्यानंतर निऱ्या हा साडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. निऱ्या पुढे येत असल्याने त्या छान बसणे आवश्यक असते. गौरीच्या स्ँटडच्या उंचीप्रमाणे त्या अॅडजस्ट करायच्या असल्याने त्याचप्रमाणे निऱ्या घालून घ्या.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

संपूर्ण साडीच्या निऱ्या घालून पहिल्या तीन निऱ्या सोडायच्या आणि त्या स्टँडला गोडाकार गुंडाळून घ्यायच्या. उरलेल्या निऱ्या स्टँडमध्ये आत खोचून त्या सेट करुन घ्या. हे बेसिक एकदा नीट झाले की नंतर फारसा वेळ लागत नाही.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

आपली साडी नेसताना आपण ज्याप्रमाणे पीन लावतो त्याचप्रमाणे वरच्या काठापाशी आणि मध्यभागी पीन लावावी. म्हणजे या निऱ्या व्यवस्थित राहण्यास मदत होते. पुढच्या बाजूच्या निऱ्या नीट सेट करुन झाल्यावर गौरीच्या शरीराचा भाग आणि हात लावावे.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

यानंतर आपण बाजूला ठेवलेला पदर गौरीच्या उजव्या हाताखालून घेऊन डाव्या खांद्यावर आपण ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे घ्या. आधीच आपण पदर सेट करुन ठेवल्याने तो लावायला फारसा वेळ लागत नाही.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

पदर सेट करुन झाल्यावर गौरीचा मुखवटा शरीराला लावून घ्यावा आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार गौरीला एक एक दागिने घालावेत.

गौरींना ५ मिनीटांत नेसवा चोपून साडी, पाहा साडी नेसवण्याच्या ७ सोप्या स्टेप्स...

त्यानंतर पदर डोक्यावरुन घ्यायला आवडत असेल तर डोक्यावरुन घेऊन दुसऱ्या खांद्यावरुन घेऊन उजव्या हातापाशी ठेवावा.