Gautami Patil : सतत चर्चेत असणारी गौतमी पाटील कोण? का तिचे नृत्य एवढे वादग्रस्त आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 14:05 IST
1 / 19सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील डान्सशिवाय लावणी आणि अश्र्लिलतेच्या कारणावरून कायम वादात असते. 2 / 19एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी सांडल्यानंतर तिचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर इतर कलाकारांनीही तिच्या नृत्यावर नाराजी व्यक्त केली. 3 / 19खूप कमी कालावधीत गौतमी पाटीलनं सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते गर्दी करतात. चुकीचे हावभाव आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे ती नेहमीच ट्रोल होते. गौतमीच्या डान्सशिवाय तिचे काही बोल्ड फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 4 / 19गौतमी ही मुळची शिंदखेडा, धुळे येथील असून डिजे शोव्ह मध्ये डान्सर म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे खेड्यात असो किंवा मोठ्या शहारात तिला आवर्जून बोलावले जाते. 5 / 19गौतमी आता २७ वर्षाची असून ती वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षापासून डान्स करत आहे. official_gautami94_ हे तिचं ऑफिशिअल इंस्टाग्राम आहे. या अकाऊंटवरून ती नेहमीच डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.6 / 19सोशल मीडियावर अशी बरीच अकाऊंट्स आहेत. जिथे गौतमीचे डान्स व्हिडिओज पोस्ट करण्यात आले आहेत. 7 / 19अकलूज लावणी महोत्सवात गौतमीनं सगळ्यात आधी बॅकग्रांऊड डान्सर म्हणून काम केलं. 8 / 19या कामाचे तिचे ५०० ते १०० रूपये मिळायचे. 9 / 19. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' हे तिचं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.10 / 19सोशल मीडियावर ती डान्सव्यतिरिक्त तिच्या बोल्ड लूकचेही फोटोज शेअर करत असते. 11 / 19चाहत्यांना तिचे सर्वच लूक खूप आवडतात. फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होतो. 12 / 19अलिकडेच नृत्यांगना माधुरी पवारनंही गौतमीच्या डान्सवर भाष्य केलं. 13 / 19तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक गर्दी करतात. 14 / 19अलिकडेच एका प्रेक्षकाने छेड काढल्यानं गौतमीनं त्याला चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.15 / 19लावणीच्या कार्यक्रमाला सांगलीतील अनेक भागातून तिचे चाहते आणि प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. 16 / 19हा व्हिडिओ ३ महिने जुना असल्याचं सांगितलं जात आहे.17 / 19(Image Credit- Social Media)18 / 19(Image Credit- Social Media)19 / 19(Image Credit- Social Media)