गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 1:36 PM 1 / 9गोकुळाष्टमीचा सण म्हणजे राज्यभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आपण घरीही श्रीकृष्णाची पूजा करतो (Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos). 2 / 9यावेळी कन्हैयाला छआन सजवून फुलांनी आणि रांगोळीने आपण सजवतो. ऐनवेळी कोणती कशी रांगोळी काढायची असा प्रश्न पडतो. 3 / 9 एखादी छानशी हंडी आणि बासरी हे गोकुळाष्टमीचे प्रतिक असणाऱ्या गोष्टी रांगोळीत खूप सुंदर दिसतात. यामध्ये आपण हव्या तशी वेगवेगळ्या डीझाईन्स करु शकतो. 4 / 9हातात कमी वेळ असेल तर नुसते मोरपीस आणि बासरी थोड्या मोठ्या आकाराचे काढले तरी सुंदर दिसते. मात्र याची रंगसंगती छान करावी लागते. 5 / 9 घरात पांढऱ्या टाइल्सवर रांगोळी काढायची असेल तर गडद रंग वापरुन हंडी, बासरी आणि मोरपीस काढू शकतो. 6 / 9रांगोळीचे आकर्षक रंग वापरुन नवीन पद्धतीने काडीने किंवा बोटाने हंडीची डीझाईन केल्यास ती छान दिसते. यामध्ये पांढऱ्या रांगोळीचा वापर करुन हंडीतून पडणारे दही दाखवू शकतो.7 / 9श्रीकृष्ण असे लिहून त्यावर बासरी आणि साधीशी हंडी काढायची. त्यावर फुलांचा वापर करुनही सोपी सुटसुटीत रांगोळी काढता येते. 8 / 9मोरपीस ही कृष्णाची विशेष ओळख असल्याने या मोरपिसाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बऱ्याच रांगोळ्या आपण काढू शकतो. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications