गुढी पाडवा विशेष : गुढी पाडव्याला दारासमोर काढा सोप्या आकर्षक रांगोळ्या; पटकन काढून होतील १० सुंदर रांगोळ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 8:29 PM 1 / 10गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्षाचा पहिला सण. या दिवशी सगळेजण आनंदाने गुढी उभारतात आणि नवीन वर्ष सुखासमाधाचं आनंदाने जावं यासाठी प्रार्थना करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर रांगोळ्या असतील तर घराची शोभा अधिकच वाढून दिसते. (Easy Rangoli Designs For Gudi Padwa)2 / 10गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोडाधोडाचा स्वंयपाक बनवला जातो. (Gudi Padwa Rangoli Designs) अशावेळी कामाच्या गडबडीत रांगोळ्या काढायाला फारसा वेळ मिळत नाही. दारासमोर ५ ते १० मिनिटांत काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिजाईन्स पाहूया.3 / 10 वरणाच्या चमच्याच्या वापर करून तुम्ही गुढी काढू शकता. त्यानंतर आपल्या आवडीचे रंग त्यात भरा.4 / 10गुढीपाडव्यासाठी संस्कार भारती रांगोळी काढणंसुद्धा उत्तम पर्याय आहे. संस्कार भारती रांगोळीसाठी तुम्हाला जास्तवेळ द्यावा लागेल. 5 / 10गुढीपाडव्याची रांगोळी काढणं खूपच सुंदर आहे. युट्युबवर बरेच व्हिडिओज उपलब्ध आहेत किंवा ठिपक्यांच्या साहाय्याने रांगोळ्या काढू शकता. 6 / 10आधी खडून जमीनिवर आराखडे काढून त्यानंतर रांगोळी काढा. 7 / 10तांब्या आणि नथीचे ठिपके काढून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता. 8 / 10शुभ गुढी पाडवा असा संदेश रांगोळीवर लिहा किंवा आजूनबाजूने फुलांची डिजाईन काढा. 9 / 10दिव्यांनी रांगोळी डेकोरेट केल्यास अधिक चांगला लूक येईल.10 / 10गुढी पाडव्यासाठी तुम्ही फुलांची रांगोळीसुद्धा काढू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications