सॅटिनची साडी, रत्नजडित ब्लाऊज - हार्दिक पांड्याची बायको नाताशाचा रॉयल लूक! ब्लाऊजला दागिने लावण्याचा नवा ट्रेण्ड, पाहा फोटो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 1:37 PM 1 / 11क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि बिग बॉस स्टार नताशा स्टॅंकोविक यांचा १ जानेवारी २०२० रोजी साखरपुडा झाला. हार्दिकने प्रेयसी नताशाला दुबईमध्ये एका याचवर डायमंड एंगेजमेंट रिंग घालून प्रपोज केले. नताशानेदेखील या नात्याचा स्विकार केला. त्यानंतर या दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे(Hardik Pandya's Wife, Natasa Stankovic's Blouse For 'Phera' Was Made From Real 'Jadau' Jewels).2 / 11या दोघांनी ३१ मे २०२० रोजी कोविड काळात घरीच छोटेखानी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर जुलै २०२० रोजी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य असे ठेवण्यात आले. 3 / 11यानंतर ३१ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी त्यांच्या अगदी जवळच्या फॅमिली मेंबर आणि मित्र मैत्रिणींना बोलवून गोव्यामधील एका रिसॉर्टमध्ये मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थिती छोटा लग्नसोहळा केला होता. 4 / 11या जोडप्याने १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पुन्हा विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उदयपूरमध्ये ३ दिवसांचा शाही विवाह सोहळा आयोजित केला होता. हार्दिक आणि नताशा यांनी हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. 5 / 11या लग्नादरम्यान नताशाने परिधान केलेल्या शाही लग्न जोड्याची सध्या सोशल मीडियावर फारच चर्चा रंगली आहे. 6 / 11नताशाने सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला (Abu Jani Sandeep Khosla) यांनी डिझाईन केलेला लेहेंगा व साडी परिधान केली होती. लग्नमंडपात नताशाने एंट्री करताना गोल्डन, लाल रंगाचे कॉम्बिनेशन असलेला लेहेंगा घातला होता. फेरे घेण्याच्या विधीला रॉयल लाल रंगाच्या साडीमध्ये नताशा सुंदर दिसत होती. 7 / 11नताशाने रॉयल लाल रंगांची सॅटिनची साडी नेसली होती. या साडीचा काठ गोल्डन मोती, लाल व हिरव्या रंगाच्या बिड्सने सजवला होता. या प्लेन रॉयल लाल रंगाच्या साडीला असणाऱ्या एम्ब्रॉयडरीमुळे ती साडी अतिशय सुंदर दिसत होती. ती साडी नेसल्याने नताशा लूक रॉयल दिसत होता. 8 / 11नताशाच्या साडीसोबतच तिच्या ब्लाऊजची देखील तितकीच चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे. नताशाचा ब्लाऊज खूपच आकर्षक आणि शाही दिसत होता. या ब्लाउजच्या बाह्यांना ज्वेलरीने सजविले होते. या ब्लाऊजला जडाऊ ज्वेलरी पिसेस व झुमक्यांनी सजवून अधिक रॉयल लूक देण्यात आला होता. हा ब्लाऊज तिने खास स्वतःसाठी कस्टम मेड करून बनवून घेतला होता.9 / 11नताशाने परिधान केलेल्या लेहेंग्यावर मॅचिंग दुपट्टा घेतला होता. हा दुपट्टा ऑर्गेंझा प्रकारांतील असून याच्या दोन्ही बाजूंना गोल्डन सिक्विनची भरजरी लेस लावण्यांत आली होती. 10 / 11नताशाला परफेक्ट मॅच करण्यासाठी हार्दिकने देखील ऑफव्हाईट जामदानी शेरवानी परिधान केली होती. या शेरवानीवर गोल्डन जरदोसी व रेड अरु ग्रीन बिड्सची एम्ब्रॉयडरी केली होती. हार्दिकसुद्धा या शेरवानी लूकमध्ये फारच रोमँटिक दिसत होता. 11 / 11हार्दिक, नताशाचा लहान मुलगा अग्यस्त्य याने देखील आई - वडिलांच्या कपड्यांसोबत ट्विनिंग केलेले दिसून येते. आणखी वाचा Subscribe to Notifications