उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

Updated:April 15, 2025 15:28 IST2025-04-15T15:14:54+5:302025-04-15T15:28:34+5:30

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

उशींना वेगवेगळे कव्हर किंवा खोळी घालून आपण त्या छान सजवून ठेवत असतो..(home hacks for removing yellow stains from pillows)

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

जेव्हा उशीच्या खोळीवर एखादा पदार्थ सांडतो किंवा त्यावर कशाचा तरी डाग पडतो तेव्हा आपण खोळ बदलतो आणि दुसरं नवं कव्हर तिला घालतो.(how to clean stains from pillow?)

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

असं केल्याने उशीचं कव्हर तर स्वच्छ होतं, पण तिच्यावर पडलेले डाग मात्र तसेच राहतात. आता अशी उशी धुणं हे मोठंच अवघड काम..

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

म्हणूनच आता ही एक सोपी ट्रिक पाहा. हा उपाय करून तुम्हाला उशी न धुताही ती अगदी नव्यासारखी स्वच्छ करता येईल. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी उशीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहेत ती जागा थोडी ओलसर करून घ्या.

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

यानंतर एका भांड्यामध्ये व्हिनेगर घ्या आणि त्याच्या जवळपास सारख्याच प्रमाणात पाणी घ्या. आता पाणी आणि व्हिनेगर या मिश्रणात एक जाडसर नॅपकिन बुडवा आणि हलका पिळून घ्या. आता या नॅपकिनने जिथे डाग पडले आहेत ती जागा पुसून स्वच्छ करून घ्या.

उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक

एका पुसण्यात डाग स्वच्छ झाले नाही तर दोन ते तीन वेळा हाच उपाय करून पाहा. उशीवरचे डाग निघून ती नक्कीच स्वच्छ होईल.