Join us   

अंघोळीचे टॉवेल, मिक्सर-रोज लागणाऱ्या वस्तू किती दिवस वापराव्यात? घरातल्या वस्तूंची एक्सपायरी डेट अशी ठरवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:10 AM

1 / 11
स्वयंपाकघरात, हॉलमध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या रोज वापरात असतात. वर्षानुवर्ष त्यात वस्तू वापरल्यामुळे त्यावर धूळ साचते तर कधी या वस्तू वापरायोग्य राहत नाहीत. ज्यामुळे घरही जुनाट दिसतं. घरात रोज वापरायच्या वस्तू किती दिवसांनी बदलाव्यात पाहूया
2 / 11
१) भांडी घासायचा स्पंज मोकळा झाला असेल त्याचे धागे निघाले असतील तर लगेच बदलून दुसरा वापरायला घ्या.
3 / 11
२) शॉव्हर कर्टन लायनर म्हणजे बाथरूमधील पडदे दर ३ महिन्यांनी बदला.
4 / 11
३) टॉयलेट ब्रश ६ ते १२ महिन्यांनी बदलायला हवा.
5 / 11
४) बाथ मॅट १८ ते २४ महिन्यांनी बदलाव्य. ओलाव्यामुळे लवकर खराब झाले असतील तर बाथ मॅट बदलायला उशीर करू नका.
6 / 11
५) अंघोळीचे टॉवेल चांगल्या स्थितीत असतील तर दर २ वर्षांनी बदलावेत किंवा तुम्ही एक वर्षानेही नवीन घेऊ शकता.
7 / 11
६) बेड पिलो १ ते २ वर्ष वापरा
8 / 11
७) नॉनस्टिक कुकरवेअर ५ वर्ष वापरल्यानंतर बदला.
9 / 11
८) मिक्सर १० ते १२ वर्षांनी बदलून दुसरा घ्या.
10 / 11
९) डोअर मॅटचे जेव्हा धागे निघणं सुरू होईल तेव्हा बदला.
11 / 11
१०) सोफा काऊच ७ ते १५ वर्षांनी बदला.
टॅग्स : हेल्थ टिप्ससुंदर गृहनियोजन