घराच्या भिंती मुलांनी खडू, स्केचपेन, मार्करने रंगवल्या? ७ घरगुती सोपे उपाय, भिंती चमकतील नव्यासारख्या...
Updated:January 4, 2025 18:51 IST2025-01-04T18:41:51+5:302025-01-04T18:51:28+5:30
How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall : How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint : Home Hacks To Clean Crayon, and Pencil Marks From The Wall : घराच्या भिंती मुलांनी खडू, स्केचपेन, मार्करने रंगवल्या म्हणून त्यांना ओरडू नका त्याऐवजी करा हे सोपे उपाय...

घराच्या भिंतींवर खडू, स्केचपेन, मार्करने रेघोट्या ओढणे (How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint) असा प्रकार प्रत्येक घरातील लहान मुलं करतातच. यामुळे मुलांची तर मजा होते पण त्यांच्या आईला हे सगळं साफ करण्याची सजा मिळते. यामुळे भिंती अतिशय खराब दिसू शकतात. त्यामुळे फारशी मेहेनत न घेता हे डाग अगदी सोप्या पद्धतीने कसे काढावेत यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर करून आपण भिंती स्वच्छ करु शकतो, ते पाहूयात(How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall ).
१. बेकिंग सोडा :-
बेकिंग सोडा एक उत्तम क्लिंजिंग एजंट मानले जाते. याचा वापर केल्याने भिंतीवरील डाग सहजरीत्या निघतात. सर्वप्रथम बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. हे मिश्रण भिंतीवर शिंपडा, आणि कापडाच्या मदतीने भिंत साफ करून घ्या. असे केल्याने भिंतीला नवी चमक मिळेल.
२. व्हिनेगर :-
व्हिनेगरपासून लिक्विड तयार करण्यासाठी एका कपमध्ये प्रत्येकी अर्धा कप पाणी घ्या आणि व्हिनेगर घ्या. स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण ओता. आता हे मिश्रण भिंतीवर स्प्रे करा. स्क्रबरच्या सहाय्याने डाग घासून घ्या.
३. टूथपेस्ट :-
एका जुन्या ब्रशवर टूथपेस्ट घेऊन ती थेट भिंतींवरील खडू, स्केचपेन, मार्करच्या डागांवर घासावी. यामुळे भिंती पुन्हा पहिल्यासारख्या स्वच्छ होतील.
४. कपडे धुण्याच्या साबणाचं पाणी :-
भिंती साफ करण्यासाठी कपडे धुण्याच्या साबणाचं पाणी वापरा. स्क्रबरच्या सहाय्याने भिंत साफ करा. यामुळे डाग हळूहळू निघून जातील. याचा वापर करून आपण घरातील प्रत्येक भिंत साफ करू शकता.
५. डिटर्जेंट :-
एका बाऊलमध्ये थोडेसे गरम पाणी घेऊन त्यात डिटर्जेंट घालून थोडी घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट टूथब्रशच्या मदतीने थेट खडू, स्केचपेन, मार्करच्या डागांवर घासावी. यामुळे स्केचपेन, क्रेयॉन, पेन्सिलच्या खुणा आणि भिंतीवरील डाग देखील काढू शकता.
६. डिशवॉश लिक्विड :-
भिंतींवरील स्केचपेन, क्रेयॉन, पेन्सिलच्या खुणांचे डाग काढण्यासाठी आपण डिशवॉश लिक्विडचा देखील वापर करु शकता. यासाठी डिशवॉश लिक्विड आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्क्रबरच्या मदतीने डागांवर घासा यामुळे भिंती स्वच्छ होतील.
७. वॉल क्लीनिंग क्लिनर :-
भिंतीवरील हलके डाग काढण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा देखील वापर करु शकता. तुम्ही बाजारातून वॉल क्लीनिंग क्लिनर देखील खरेदी करू शकता. याचा वापर केल्याने अगदी हट्टी डागही दूर होऊ शकतात.