पावसाळ्यात डास वाढले- कडाकड चावतात? 'हे' जादुई पाणी अंगाला लावा, डास चार हात लांब राहतील... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 9:09 AM 1 / 7पावसाळ्यात डासांचे प्रमाण खूप वाढते. पाऊस पडल्याने सगळीकडे ओलसरपणा वाढतो. त्यामुळे मग डासांची निर्मितीही वाढते. म्हणूनच इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाळ्यात डासांच प्रमाण जरा जास्तच वाढलेलं दिसतं.2 / 7डास चावल्याने त्रास तर होतोच, पण त्यातून डेंग्यू, मलेरिया, झिका, चिकनगुनिया असे आजारदेखील पसरतात. त्यामुळेच डासांचा वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे.3 / 7आपण घरात डास पळवून लावण्याचे मशिन लावून ठेवतो. पण घराबाहेर पडल्यानंतर डासांपासून कसे संरक्षण मिळवावे, असा प्रश्न पडतोच. बाजारात मिळणाऱ्या मॉस्किटो रिपेलंट क्रिममध्ये केमिकल्स असतात. 4 / 7त्यामुळे ते मुलांना लावावे की नाही, असा प्रश्न पडतो. कारण बऱ्याच जणांना ते सहन होत नाहीत आणि अंगावर रॅश येते, अंग लालसर होते. म्हणूनच आता हा एक सोपा उपाय करा. हा उपाय loudmumma and buttbaby.india या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.5 / 7यामध्ये आपण घरच्याघरी एक लिक्विड तयार करणार आहोत, जे लावल्याने डास आपल्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत. ते लिक्विड तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा कापुराची पावडर टाका.6 / 7यानंतर त्यामध्ये २ चमचे कडुलिंबाचं तेल आणि १ चमचा खोबरेल तेल टाका. हे सगळं मिश्रण एकत्र कालवून घ्या आणि शक्य असेल तर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.7 / 7हे तेल अंगाला लावल्यास डास तुमच्या आजुबाजुला फिरकणार नाहीत. मुलांना खेळायला पाठवताना त्यांना हे आठवणीने हे तेल लावून पाठवा. आणखी वाचा Subscribe to Notifications