घर स्वच्छ- चकाचक ठेवण्याचे स्वस्तात मस्त उपाय, बघा घरगुती पदार्थ वापरून कशी करायची स्वच्छता By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 5:33 PM 1 / 9घराची स्वच्छता करून घर छान मेन्टेन ठेवणं हे मोठंच कौशल्याचं काम असतं आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाईवरच असते.2 / 9घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते. घरातलेच काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येते. ते कसं करायचं ते पाहूया3 / 9 लिंबाचा वापर करून तुम्ही घरातले स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता. 4 / 9बोअरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात.5 / 9सिंकमधून, बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते. ती कमी करण्यासाठी सिंकमधे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका. आणि नंतर त्यावर कडक पाणी ओता. दुर्गंधी जाईल.6 / 9स्वयंपाक घरातल्या ट्रॉलीला असणारे स्तीलचे हॅण्डल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा.7 / 9आरसे, खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमान पत्राचा कागद आणि टूथपेस्ट वापरून पाहा 8 / 9लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑईल टाका. फर्निचरवर छान चमक येईल.9 / 9फरशा पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला. फरशा स्वच्छ दिसतील, चमकतील. आणखी वाचा Subscribe to Notifications