बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

Published:August 18, 2022 06:15 PM2022-08-18T18:15:07+5:302022-08-19T14:30:27+5:30

Homemade Ganpati Decoration Ideas : घरच्या घरी करा बाप्पासाठी असे डेकोरेशन

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यावर घरोघरी साफसफाई, डेकोरेशनची तयारी सुरू झाली आहे. बाजारातून प्लास्टीकचे महागडे काहीतरी आणण्यापेक्षा घरच्या घरी थोडी कल्पकता वापरुन आणि सुटसुटीत असे डेकोरेशन करायचा विचा असेल तर त्यासाठी काही सोप्या आयडीया पाहूया (Homemade Ganpati Decoration Ideas).

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

बाप्पांच्या स्वागताची तयारी करताना ते काही दिवस राहणार ती जागा सुशोभित करणे ही एक महत्त्वाची गोष्ट असते. यामध्ये थोडी कल्पकता वापरली तर आपण अगदी घरच्या घरी पण मस्त डेकोरेशन करु शकतो. पण काय करायचे हे आपल्याला अनेकदा सुचत नाही. त्यासाठीच गणपती डेकोरेशनचे काही सोपे पर्याय...

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

नेहमीचे टिपिकल फुलांचे, कागदाचे डेकोरेशन नको असेल तर असे थोडे वेगळे आणि तरी हटके असेही डेकोरेशन आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. यामध्ये फक्त विटा, दिवे आणि काही रोपं वापरली असल्याने हे डेकोरेशन पूर्णत: इको फ्रेंडली होते.

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

युट्यूबवर क्राफ्टचे असंख्य व्हिडिओज असतात. हे व्हिडिओ पाहून आपण घरात मुलांच्या मदतीने छानसे डेकोरेशन नक्की करु शकतो. यामुळे आपल्याला घरी डेकोरेशन केल्याचा आनंद तर मिळतोच पण मुलांनाही छान अॅक्टीव्हिटी मिळते आणि आपण काहीतरी केलं याचं समाधानही मिळतं.

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

पेपर क्विलींग ही काहीशी सोपी आणि तरीही अतिशय सुंदर दिसणारी कला आहे. मात्र यासाठी पेशन्स खूप लागतात. पेपर क्विलींगचे कानातले, भेटकार्ड अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. याच क्विलींगपासून आपण गणपतीसाठी छानसे काहीतरी डेकोरेशन नक्की करु शकतो.

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

तुमचा गणपती १.५ किंवा ५ दिवसांचा असेल तर तुम्ही फुलांचे डेकोरेशनही नक्की करु शकता. हे डेकोरेशन दिसते तर सुंदर आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषणही होत नाही. मात्र यासाठी तुमच्याकडे चांगली कल्पनाशक्ती असायला हवी.

बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही!

तुम्हाला अगदी साधे, सुटसुटीत आणि तरीही देखणे असे डेकोरेशन करायचे असेल तर अशाप्रकारची वेगवेगळ्या रंगाची, आकाराची फुले तुम्ही नक्की करु शकता. ही फुले होतातही पटकन आणि दिसतातही छान.