बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया...सुंदर आणि स्वस्त-मस्तही! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 6:15 PM 1 / 7आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यावर घरोघरी साफसफाई, डेकोरेशनची तयारी सुरू झाली आहे. बाजारातून प्लास्टीकचे महागडे काहीतरी आणण्यापेक्षा घरच्या घरी थोडी कल्पकता वापरुन आणि सुटसुटीत असे डेकोरेशन करायचा विचा असेल तर त्यासाठी काही सोप्या आयडीया पाहूया (Homemade Ganpati Decoration Ideas).2 / 7बाप्पांच्या स्वागताची तयारी करताना ते काही दिवस राहणार ती जागा सुशोभित करणे ही एक महत्त्वाची गोष्ट असते. यामध्ये थोडी कल्पकता वापरली तर आपण अगदी घरच्या घरी पण मस्त डेकोरेशन करु शकतो. पण काय करायचे हे आपल्याला अनेकदा सुचत नाही. त्यासाठीच गणपती डेकोरेशनचे काही सोपे पर्याय...3 / 7नेहमीचे टिपिकल फुलांचे, कागदाचे डेकोरेशन नको असेल तर असे थोडे वेगळे आणि तरी हटके असेही डेकोरेशन आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. यामध्ये फक्त विटा, दिवे आणि काही रोपं वापरली असल्याने हे डेकोरेशन पूर्णत: इको फ्रेंडली होते. 4 / 7युट्यूबवर क्राफ्टचे असंख्य व्हिडिओज असतात. हे व्हिडिओ पाहून आपण घरात मुलांच्या मदतीने छानसे डेकोरेशन नक्की करु शकतो. यामुळे आपल्याला घरी डेकोरेशन केल्याचा आनंद तर मिळतोच पण मुलांनाही छान अॅक्टीव्हिटी मिळते आणि आपण काहीतरी केलं याचं समाधानही मिळतं. 5 / 7पेपर क्विलींग ही काहीशी सोपी आणि तरीही अतिशय सुंदर दिसणारी कला आहे. मात्र यासाठी पेशन्स खूप लागतात. पेपर क्विलींगचे कानातले, भेटकार्ड अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. याच क्विलींगपासून आपण गणपतीसाठी छानसे काहीतरी डेकोरेशन नक्की करु शकतो. 6 / 7तुमचा गणपती १.५ किंवा ५ दिवसांचा असेल तर तुम्ही फुलांचे डेकोरेशनही नक्की करु शकता. हे डेकोरेशन दिसते तर सुंदर आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषणही होत नाही. मात्र यासाठी तुमच्याकडे चांगली कल्पनाशक्ती असायला हवी. 7 / 7तुम्हाला अगदी साधे, सुटसुटीत आणि तरीही देखणे असे डेकोरेशन करायचे असेल तर अशाप्रकारची वेगवेगळ्या रंगाची, आकाराची फुले तुम्ही नक्की करु शकता. ही फुले होतातही पटकन आणि दिसतातही छान. आणखी वाचा Subscribe to Notifications