टॉवेल धुवूनही अस्वच्छ, मळका दिसतो ?८ सोप्या टिप्स, रोजच्या वापरातला टॉवेलही दिसेल नव्यासारखा... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 10:30 AM 1 / 9जेव्हा आपण कुठल्याही चांगल्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा त्या हॉटेल्समधले पांढरेशुभ्र टॉवेल वापरण्यास खूप चांगले वाटते. हे असे पांढरेशुभ्र टॉवेल पाहून एकदा तरी नक्कीच आपल्या मनात येते की, आपला टॉवेल इतका स्वच्छ का नाही ? आपण रोज वापरणारे टॉवेल स्वच्छ धुतो तरी देखील ते स्वच्छ धुवून तितकेसे स्वच्छ होत नाही. अशावेळी आपण काही सोप्या टिप्सचा वापर करून आपल्या नेहमीच्या वापरातले टॉवेल हॉटेलच्या टॉवेलसारखे कायम फ्रेश आणि पांढरेशुभ्र ठेवू शकतो (How to Wash Towels to Keep Them Clean, Fresh, and Fluffy).2 / 9जर तुमचा नेहमीचा टॉवेल सतत वापरुन खराब झाला असेल आणि तो स्वच्छ करण्यासाठी आपण चांगल्या दर्जाचे डिटर्जंट देखील वापरु शकता. यामुळे खराब झालेले टॉवेल चमकदार आणि मऊ राहण्यास मदत होईल. 3 / 9टॉवेल नेहमी गरम पाण्यात धुवा. गरम पाणी आपल्या टॉवेलमधील घाण आणि बॅक्टेरिया अगदी सहजपणे काढून टाकण्यास मदत करते. एवढेच नाही तर गरम पाण्यात टॉवेल धुतल्याने ते कितीही मळलेले किंवा खराब झालेले असले तरीही लवकर स्वच्छ होतात. 4 / 9जर तुम्ही पांढरे टॉवेल स्वच्छ करत असाल तर ब्लीचचा वापर करावा. ब्लिचचा वापर केल्याने टॉवेल चमकदार ठेवण्यास मदत होते आणि त्यातील बॅक्टेरिया व घाण काढून टाकली जाते. पण जर टॉवेल्स रंगीत असतील तर कलर - सेफ ब्लीच वापरणे चांगले. यामुळे रंगीत टॉवेलचा रंग न जाता त्याचा रंग आहे तसाच राहतो. 5 / 9टॉवेल मऊ आणि फ्रेश ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे फॅब्रिक सॉफ्टनर वापरा. टॉवेल स्वच्छ करण्यासाठी फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर केल्यास टॉवेलमध्ये ताजेपणा आणि सुगंध कायम टिकून राहील.6 / 9टॉवेल स्वच्छ धुतल्यानंतर, त्यातील कुबट वास घालवण्यासाठी आपण पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करु शकता. एका बादलीत पाणी घेऊन त्यात एक कप व्हिनेगर ओतावे या व्हीएनगर आणि पाण्याच्या मिश्रणात हा धुतलेला टॉवेल तासभर बुडवून ठेवावा. या टिपचा वापर केल्यास टॉवेलमधून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी काढून टाकण्यास मदत होते. 7 / 9टॉवेल पूर्णपणे कोरडे करण्यासाठी आपण ड्रायरचा वापर करु शकता. जर तुम्ही ड्रायर वापरत नसाल तर टॉवेल सूर्यप्रकाशात व्यवस्थित वाळवून घ्यावा. यामुळे टॉवेल व्यवस्थित वाळून कोरडे होतील आणि त्यांचा ताजेपणा टिकून राहील.8 / 9 जर तुम्ही टॉवेल धुताना पाण्यात एक कप बेकिंग सोडा घातला तर यामुळे टॉवेलमधील दुर्गंधी दूर करण्यास मदत होते. 9 / 9जर तुमचे टॉवेल खूप जास्तच खराब झाले असेल किंवा मळले असेल तर असे टॉवेल किमान दोन वेळा तरी धुवावे. हे टॉवेल दोन वेळा धुताना पहिल्यांदा ब्लीच आणि डिटर्जंटचा वापर करावा तर दुसऱ्यांदा व्हिनेगर किंवा फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करून टॉवेल दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यावे. आणखी वाचा Subscribe to Notifications