How to save money : वाह, कमाल! वय ३५ अन् 'या' बाईनं आतापर्यंत केली १० कोटींची बचत; महिलेची भन्नाट 'सेविंग टेक्निक' Published:September 27, 2021 07:45 PM 2021-09-27T19:45:10+5:30 2021-09-27T20:05:51+5:30
How to save more money in less time : Saving Tips आता दोघांनीही नोकरी सोडली आहे. वेळ मिळेल तसा हे दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला जातात. आजही हे जोडपं अनावश्यक खर्च करणं टाळतं. कपडे खरेदी करणं टाळून आणि महागड्या हॉटेल्समध्ये जेवणावर खर्च न करता १० कोटी रूपये वाचवले जाऊ शकतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खंरय. ही कहाणी अशा महिलेची आहे जिनं आपल्या दैनंदिन आयुष्यात बचत करून जवळपास १० कोटी रूपये साठवले आहेत. वयाच्या ३५ व्या वर्षी या महिलेनं निवृत्ती घेतली आहे. या महिलेचं नाव केटी डोनेगन आहे. मागच्या २ वर्षांपासून केटीनं आपला पती एलनसह अनेक देशांची सफर केली आहे.
केटी डोनेगनं द सन शी बोलताना सांगितले की,'' माझी आई एलिसन एक शिक्षिका आहे आणि माझे वडील क्रिस मार्केट रिसर्चर आहेत. आमच्याकडे सामान्य लोकांप्रमाणेच जीवनावश्यक गरजांपूरताच पैसे यायचे. फॅन्सी हॉटेलमध्ये जाण्यासाठी, सुट्टी इन्जॉय करण्यासाठी आमच्याकडे कधीच पैसे नसायचे. मी नेहमीच माझा पॉकेट मनी वाचवून ठेवायची. पैसे खर्च करण्यापेक्षा हातात असलेले पैसे पाहूनच मी जास्तु खूश व्हायचे.''
केटी डोनेगननं पुढे सांगितलं की, ''सुरूवातीला मी ९ पाऊंड प्रति तासाच्या हिशोबानं काम केलं. २००५ मध्ये कोस्टा रिकाला गेले आणि एलनला भेटले. नंतर युकेवरून परत आले आणि अभ्यासाला सुरूवात केली. याचदरम्यान मी गरज नसताना खर्च करणं थांबवलं. नवीन कपडे घेतले आणि स्वस्त रेस्टॉरंटमध्ये मी जेवले. यावेळी कधीच कोणाकडून कर्ज घेतलं नाही.''
२००८ मध्ये मी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी एलनच्या आईकडे शिफ्ट झाले. त्या घरासाठी मला डिपॉजिट द्यावं लागलं नाही. सुरूवातीला मला दर महा २८,५०० पाऊंडची नोकरी मिळाली. एलन शिकवण्याचं काम करायचे. या कालावधीत आम्ही आमची जूनी गाडी वापरली. बाहेर नाईट आऊटला जाण्याऐवजी मी घरीच पार्टी केली.'' (Image Credit- The Sun)
केटी डोनेगननं सांगितले की, ''२ वर्षात मी जवळपास ४२ हजार पाऊंड्सची बचत केली. २०१३ मध्ये मी लग्न केले. लग्नासाठीही लोकल कम्यूनिटी हॉल बूक केला होता. लोकांना ई-मेलच्या माध्यमातून आमंत्रण पाठवलं. मित्रांना लग्नाची तयारी करायला सांगून इतर खर्च कमी केले. (Image Credit- Mirror.co.uk)
२०१४ पर्यंत मी ५८०० पाऊंड कमवायला लागले होते. २०१५ मध्ये आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरूवात केली. याचा फायदा झाल्यानं आमची २,९१,००० पाऊंडची बचत केली.'' (Image Credit- news.co.uk)
केटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षीच्या गुंतवणूकीतून जवळपास ६५ हजार पाऊंड्सची कमाई होते. आता दोघांनीही नोकरी सोडली आहे
वेळ मिळेल तसा हे दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला जातात.आजही हे जोडपं अनावश्यक खर्च करणं टाळतं.
याशिवाय लोकांना पैसे वाचवण्यासाठी मोफत सल्लेसुद्धा देतात.