Join us

ॲल्युमिनियम कढई, डबे कळकट झाले? फक्त २ गोष्टी वापरून धुवा- आरशासारखे चकचकीत होतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 15:08 IST

1 / 5
धान्य किंवा किराणा सामान भरून ठेवण्यासाठी अनेक घरांमध्ये मोठमोठे ॲल्युमिनियमचे डबे असतात. रोजच्या स्वयंपाकासाठीही ॲल्युमिनियमची कढई वापरली जाते.(how to clean aluminium kadhai and utensils?)
2 / 5
पण बऱ्याचदा असं होतं की त्या वस्तूंचा रोजच वापर असल्याने आणि त्यांची म्हणावी तशी स्वच्छता नियमितपणे होत नसल्यामुळे त्या वस्तूंवर काळपटपणा, चिकटपणा येतो. तो एकदा पक्का झाला तर लवकर निघता निघत नाही.(simple home hacks to clean yellow oily stains on aluminium kadhai)
3 / 5
म्हणूनच अशावेळी ॲल्युमिनियमच्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी ही एक ट्रिक वापरून पाहा..
4 / 5
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये कोणताही शाम्पू १ टेबलस्पून एवढा घ्या. त्यामध्ये १ चमचा पितांबरी घाला.
5 / 5
हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि तारेच्या घासणीने घासून काढा. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर तुमची जुनी ॲल्युमिनियमची भांडी अगदी नव्यासारखी लखलख चमकतील..
टॅग्स : सोशल व्हायरलहोम रेमेडीकिचन टिप्सस्वच्छता टिप्स