अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

Published:June 29, 2023 08:06 PM2023-06-29T20:06:05+5:302023-06-29T20:33:28+5:30

How To Properly Wash, Dry & Store Your Bras : स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध असतो, अस्वच्छ इनर वेअर्समुळे होतात गंभीर आजार...

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

महिलांच्या अंडरगारमेंट्समध्ये ब्रेसियर म्हणजेच ब्रा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. ब्रेसियर ही एक अशी गोष्ट आहे जी महिलांच्या स्तनांना योग्य आकार देण्यास मदत करते. महिलांना फॅशन, सौंदर्य आणि शारीरिक काळजी यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि त्यापैकीच एक म्हणजे ब्रा चा योग्य वापर होय. महिलांची अंडरगारमेंट्स योग्य शारीरिक मापानुसार असणे जितके गरजेचे आहे तितकेच त्यांची स्वच्छता असणे हे पण महत्वाचे आहे. ब्रेसियर हे रोज वापरल्या जाणाऱ्या या ब्रेसियरची स्वच्छता देखील ठेवणे गरजेचे असते. महिलांच्या वॉर्डरोबमध्ये ठेवलेल्या कपड्यांचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ब्रेसियर, ज्याशिवाय त्या त्यांच्या दैनंदिन जीवनाची कल्पनाही करू शकत नाहीत. बर्‍याच वेळा स्त्रिया ड्रेसशी मॅचिंग किंवा कम्फर्ट लेव्हलनुसार खूप महागड्या ब्रेसियर खरेदी करतात, परंतु ती नीट न धुतल्यामुळे ब्रा खराब होते, विशेषतः वायर्ड आणि अंडरवायर ब्रा. अशा वेळी ब्रेसियर धुताना या ८ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपण आपली महागडी ब्रेसियर खराब होण्यापासून वाचवू शकता(How to clean bras, tips for washing bras).

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

बहुतेक स्त्रिया आपल्या इतर रोजच्या सर्व कपड्यांसोबत आपली ब्रेसियर धुण्याची चूक करतात. परंतु आपल्या रोजच्या कपड्यांसोबत आपली ब्रेसियर धुणे टाळावे. यामुळे इतर कपड्यांचा ब्रेसियरच्या कापडावर परिणाम होऊन ते कापड खराब होऊ शकते. जर मशीनमध्ये जास्त फॅब्रिकचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतील तर ते आपल्या ब्रेसियरचा आकार खराब करू शकते. यासाठीच ब्रेसियर इतर कपड्यांसोबत न धुता सगळ्यात शेवटी वेगळी धुवावी.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

बाजारांत वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेसियर सहज उपलब्ध होतात. आपल्यापैकी बऱ्याच महिला पॅडेडपासून ते स्पोर्ट्सब्रापर्यंत सगळ्याच प्रकारच्या ब्रेसियर वापरतात. या सगळ्या प्रकारांतील ब्रेसियर धुताना पिळू नये. असे केल्याने त्याच्या आतील पॅडेड स्पंज सारखा भाग खराब होऊ शकतो किंवा या ब्रेसियरचा आकार बदलू शकतो. त्यामुळे ब्रेसियर धुवून झाल्यानंतर त्या व्यवस्थित मोकळ्या हवेशीर ठिकाणी वाळत घालाव्यात.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

शक्यतो ब्रेसियर धुताना त्या हाताने धुण्याचा प्रयत्न करावा. ब्रेसियर मशीनमध्ये धुणे टाळावे. ब्रेसियर मशीनमध्ये धुतल्याने त्याचे कापड खराब होऊ शकते. साध्या पाण्यात सौम्य डिटर्जंट घालून त्यात ब्रेसियर काही काळासाठी भिजत ठेवा, त्यानंतर हातांनी चोळून स्वच्छ धुवून घ्यावे. ब्रेसियर हाताने धुणेच योग्य आहे कारण मशीनमध्ये धुतल्याने त्याचे पट्टे व हुक खराब खराब होऊ शकतात.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

जर आपण ब्रेसियर हाताने धुण्याऐवजी मशीनमध्ये धूत असाल तर अशावेळी वॉशिंग बॅगचा वापर करावा. ब्रेसियर थेट वॉशिंग मशिनमध्ये धुण्याऐवजी वॉशिंग बॅगमध्ये टाकून मगच मशीनमध्ये धुण्यासाठी टाकावी यामुळे ब्रेसियरचे कापड किंवा हुक खराब होणार नाहीत.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

बहुतेक लोकांना असे वाटते की गरम पाण्यात कपडे धुण्याने कपडे चांगले स्वच्छ होतात आणि त्यातून जंतूही निघून जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमची ब्रा गरम पाण्याने धुत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात. गरम पाणी वापरल्याने ब्रेसियर मधील लवचिकता खराब होते आणि काही काळानंतर ब्रेसियरचे फॅब्रिक देखील मऊपणा गमावू लागते. त्यामुळे गरम पाण्याऐवजी ब्रेसियर सामान्य पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवावी.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

कोणतेही कापड वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये टाकून ते सुकवणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी वेळही कमी लागतो, परंतु ब्रेसियर ड्रायरमध्ये टाकून वाळवल्याने त्याचे फॅब्रिक खराब होऊ शकते. बर्‍याच ब्रामध्ये स्पॅन्डेक्स असते जे ड्रायरच्या उष्णतेने तुटते आणि ब्रेसियर तिची लवचिकता गमावते. यासोबतच ब्रेसियरचा आकारही खराब होतो.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

ब्रेसियरचे हुक धुतल्यानंतर तुटणे ही एक सामान्य समस्या आहे. बहुतेक महिलांना रोज अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तविक, जेव्हा आपण ब्रेसियर धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये ठेवतो, तेव्हा ब्रेसियरचे हुक इतर कपड्यांमध्ये अडकून ओढले जाते आणि नंतर तुटतात. अशावेळी नेहमी ब्रेसियर धुण्यापूर्वी त्याचे हुक लावा आणि नंतरच वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी ठेवा.

अस्वच्छ ब्रेसियरमुळे महिलांना होतात गंभीर आजार, ब्रेसियर धुण्याचे लक्षात ठेवा ८ नियम...

अनेकदा आतले कपडे आपण बाथरुममध्ये किंवा आतल्या बाजूला वाळत घालतो. हे कपडे दमट जागेत वाळत घातल्याने योग्य पद्धतीने वाळतातच असे नाही. काही वेळा ते कुबट राहतात आणि त्यांना वासही येऊ शकतो. मात्र हलक्या उन्हात आतले कपडे वाळत घातल्यास हवा आणि ऊन यांमुळे ते चांगले वाळतात आणि स्वच्छ कोरडे होतात.