How to Clean Brass Utensils : तांब्या पितळाची कळकट भांडी झटपट होतील चकचकीत; 5 टिप्स, पुजेची भांडी पटकन चमकतील By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:11 PM 1 / 8गणोशोत्सव (Ganpati Utsav 2022) अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलाय. घरोघरी गणपतीसाठी खरेदी करण्यासह घरातल्या साफसफाईही लगबग सुरू झाली असेल. गणपतीत तांब्या पितळाची पुजेची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवावी लागतात. महिनोंमहिने तसेच पडून राहिल्यानं ही भांडी काळपट पडलेली असतात. (How to Clean Brass Utensils) वारंवार घासूनही भांड्याना हवीतशी चमक येत नाही. (6 Tips For Cleaning Brass God Idols At Home)2 / 8पुजेत बहुतेक लोक वापरतात ती भांडी पितळ किंवा तांब्याची असतात. पूजेची भांडी जास्त वेळ साफ न केल्यास त्यामध्ये डाग दिसतात. जे अजिबात चांगले दिसत नाहीत आणि सहज साफ होत नाहीत. म्हणूनच या लेखात तांब्या पितळाची भांडी चमकवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. (Cleaning Instructions for Brass and Copper Utensils) 3 / 81) पितळ आणि तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी फक्त चिंच घ्या आणि त्यात थोडे गरम पाणी घाला. काथ्या वापरून या पाण्यानं भांडी घासून घ्या. त्यानंतर साध्या पाण्यानं भांडी स्वच्छ धुवा.4 / 82) पितांबरी पावडर तुम्हाला बाजारात मिळेल. तुम्ही स्कॉच ब्राईटमध्ये थोडी पितांबरी टाका आणि त्याने भांडी धुवा. त्यानंतर भांडी पाण्याने धुवावीत. यामुळे पूजेची भांडी चमकदार होतील.5 / 83) पूजेसाठी वापरण्यात येणारी तांबे आणि पितळेची भांडी तुम्ही पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करू शकता. यासाठी थोडे पांढरे व्हिनेगर पाण्यात टाकून उकळा. आता त्यात थोडे सर्फ आणि पाणी घाला. या द्रावणाने भांडी धुतल्याने छान चमकतील.6 / 84) लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मीठ मिसळा आणि हे मिश्रण पितळेची भांडी आणि मूर्तींवर घासून घ्या. नंतर भांडी कोमट पाण्याने धुवा. या सोप्या पद्धतीने, भांडी आणि मूर्ती नव्याप्रमाणे चमकतील.7 / 8५) तुम्ही पितळाच्या मूर्ती बेकिंग सोडा आणि लिंबानेही स्वच्छ करू शकता. लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि नंतर ही पेस्ट मूर्तींवर कापडाने लावा. काही वेळ असेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ करा.8 / 8६) यासाठी तुम्हाला एक नवीन स्क्रॅच ब्राइट घ्यावा लागेल. त्याला सर्फ लावून पितळाची भांडी स्वच्छ करा. आणखी वाचा Subscribe to Notifications