तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

Published:March 21, 2023 05:50 PM2023-03-21T17:50:00+5:302023-03-21T18:45:57+5:30

Gudi Padwa Special How to clean brass pooja items : पितळाचे दिवे चमकवण्यासाठी तुम्ही चिंचाचा वापर करू शकता. यासाठी १० ग्राम चिंच अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा.

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

देवपूजेसाठी दिवे, अगरबत्तीचा स्टॅण्ड असं सामान रोज वापरलं जातं. रोज वापरून हे साहित्य बऱ्यापैकी काळं पडतं. वातावरणात बदल झाल्यानंतरही पितळाची भांडी काळी पडतात. कामाच्या दरम्यान फारसा वेळ मिळत नसल्यानं पितळाची भांडी व्यवस्थित घासली जात नाहीत. पूजेसाठी वापरली जाणारी पितळाची भांडी, स्वच्छ नीटनेटकी असल्यास घर आणि मन प्रसन्न राहतं. (How to clean brass, pital Diya)

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

पितळाच्या दिव्यांचा वापर सकाळ संध्याकाळ पुजेसाठी केला जातो. रोजच्या रोज स्वच्छता न ठेवल्यास यात घाण जमा होते. काही घरगुती उपाय करून तुम्ही जुने, काळपट झालेले दिवे चकचकीत स्वच्छ करू शकता. (How to clean brass pooja items)

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

दिवे स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी ५ मिनिटांसाठी कोमट पाण्यात घालून ठेवून द्या. ५ मिनिटांनी पाण्यातून बाहेर काढा आणि लिंबाच्या रसात एक चतुर्थांश चमचा मीठ मिसळा.५ मिनिटांनी बाहेर काढून ठेवा.

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

अर्ध्या लिंबाच्या रसात एक चतुर्थांश चमचे मीठ मिसळा. हे मिश्रण दिव्याभोवती लिंबाच्या सालीने चोळा. दिव्याच्या सर्व भागांना लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण मऊ स्क्रबने लावा. थोडा वेळ असेच राहू द्या आणि 10 मिनिटांनंतर स्क्रबने घासून पाण्याने स्वच्छ करा. लिंबासह तुम्ही बेकींग सोड्याचा ही वापर करू शकता.

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

पितळाचे दिवे चमकवण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी १० ग्राम चिंच अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा. सॉफ्ट झाल्यानंतर चिंचेचा लगदा पितळाच्या चारही बाजूंनी चोळा. १५ मिनिटांसाठी तसंच ठेवा नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ करा.

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

पितळाचा दिवा स्वच्छ करण्यासाठी, 2 कप पाण्यात सुमारे 4 चमचे पांढरे व्हिनेगर घाला. या मिश्रणात दिवा 15 मिनिटे बुडवून ठेवा. दिव्याच्या काही भागातून तेल आणि घाण बाहेर पडतानाही तुम्हाला दिसेल आणि दिवा स्वच्छ होईल. याशिवाय एका चमचे पांढऱ्या व्हिनेगरमध्ये अर्धा चमचा मीठ घालून पितळेच्या दिव्यात ठेवून १५ मिनिटे सोडा. यानंतर, दिवा स्क्रबने घासून स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा.

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

पितळाचे दिवे स्वच्छ करण्यासाठी कुकरमध्ये बटाटे उकळून घ्या आणि या पाण्यात काही वेळासाठी दिवे ठेवा. १५ मिनिटांनंतर दिव्याला उकळेल्या बटाट्यांच्या पाण्यात भिजत ठेवा नंतर बटाटे स्वच्छ करून चांगल्या पाण्यानं धुवा. यामुळे दिवे चमकदार दिसण्यास मदत होते