how to clean floor to make it shine, simple tricks and tips to clean tiles
फरशी पुसण्याच्या पाण्यात ४ पदार्थ टाका, मुंग्या- झुरळं गायब होतील, फरशा लख्ख चमकतील..Published:June 5, 2024 01:46 PM2024-06-05T13:46:27+5:302024-06-05T13:55:38+5:30Join usJoin usNext फरशी पुसणं हे अगदी रोजचं काम. पण तरीही अगदी दररोज नेमाने फरशी पुसूनही तिच्यावर डाग राहतातच. किंवा फरशी म्हणावी तशी फ्रेश, स्वच्छ, चकाचक दिसत नाही. खासकरून घरात लहान मुलं असतील तर फरशीवर खूप डाग पडतात आणि फरशा स्वच्छ करणं कठीण होऊन जातं. म्हणूनच आता फरशी पुसण्याचा हा एक खास उपाय पाहा. यामध्ये आपण घरातलेच काही पदार्थ फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकणार आहोत. त्यामुळे फरशांवरची चमक नक्कीच वाढेल. शिवाय फरशा आणि त्यामुळे घरही छान सुगंधित होईल. हा उपाय करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे घरात वारंवार होणाऱ्या मुंग्या, झुरळं यांचं प्रमाणही खूप कमी होईल. त्यासाठी अगदी घरातल्या कानाकोपऱ्यातून स्वच्छ फरशी पुसा. हा उपाय home2tips and diy2insta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात १ लहान वाटी व्हिनेगर आणि तेवढंच फ्लोअर डिसइन्फेक्टंट घाला. त्यानंतर त्या पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून कोणतंही डिशवॉश लिक्विड घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि मग त्या पाण्याने फरशी पुसा. यामुळे फरशा अगदी नव्यासारख्या लख्ख चमकतील.टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडीCleaning tipsHomeHome remedy