1 / 9आजकाल आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळ्या धातूंपासून तयार झालेली भांडी स्वयंपाक बनविण्यासाठी वापरतो. यात स्टील,अॅल्युमिनियम याबरोबरच लोखंडी तसेच तांब्या-पितळ्याची भांडी वापरतो. पूर्वीच्या काळी स्टील आणि अॅल्युमिनियम व नॉन स्टीक यांसारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा तांबे, पितळ आणि लोखंडाचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता पुन्हा नव्याने लोखंडी भांडी वापरण्याचा ट्रेंड आला आहे. लोखंडी भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे अनेक असले तरी त्यांची काळजी देखील तितकीच घ्यावी लागते. लोखंडी भांडी वापरून झाल्यावर त्यांना व्यावस्थित स्वच्छ करणे, त्यांना गंज लागू नये म्हणून काळजी घेणे, वेळोवेळी त्यांना सिझन करणे यांसारख्या अनेक पद्धतींनी लोखंडी भांड्यांची काळजी घ्यावी लागते(Easy Guide On Restoring Rusted Iron Cookware).2 / 9१. लोखंडी भांडी नवीन आणल्यावर त्यावरील काळी कच किंवा खर काढून टाकण्यासाठी या भांड्याना साबणाने स्वच्छ धुवून ४ ते ५ वेळा घासणीने घासून घ्यावे. त्यानंतर लिंबूला मीठ लावून घासून, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. 3 / 9२. एका कापडाने भांडी पुसून कोरडी करून घ्यावीत. त्यानंतर या भांड्याला सर्व बाजुंनी तेल लावून घ्यावे गॅसच्या मंद आचेवर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यावे. 4 / 9३. त्यानंतर या लोखंडी भांड्यात थोडे तेल घालूंन त्यात १ ते २ कांदे लांब चिरून घालावेत. व हे कांदे चांगले काळे होईपर्यंत या भांड्यात परतून घ्यावे. 5 / 9४. ही कांदा परतून घेण्याची प्रोसेस सलग २ ते ३ दिवस करत राहावी. व चौथ्या दिवशी साबण आणि घासणीने घासून हे लोखंडी भांड स्वच्छ धुवून घ्यावे. 6 / 9५. सगळ्यांत शेवटी लोखंडी भांडी कापडाने स्वच्छ पुसून त्याला सर्व बाजुंनी तेल लावून घ्यावे. 7 / 9६. लोखंडी भांड व्हिनेगरमध्ये अर्धा - एक तास भिजवून ठेवा. यामुळे बराचसा गंज वस्तूपासून वेगळा होईल. जुन्या टूथब्रशने तो वेगळा झालेला गंज घासून काढून टाका. 8 / 9७. लोखंडी भांड जास्त दिवस वापरणार नसाल आणि त्यावर गंज चढत असेल तर भांड्यांना तेल लावून ठेवावीत म्हणजे त्यांच्यावर गंज चढत नाही. 9 / 9८. १ टेबलस्पून बेकिंग सोडा घेऊन तो २ कप पाण्यात मिसळा. हे तयार झालेले मिश्रण गंज आलेल्या भागावर ५ मिनिटे लावून ठेवावे. यामुळे गंज निघण्यास मदत होते.