1 / 5कुठल्याही रंगाचा शर्ट घातला तरी त्याची कॉलर खूप मळते. पण पांढरा किंवा फिकट रंगाचा जर शर्ट असेल तर त्याची कॉलर जरा जास्तच मळालेली दिसते.2 / 5आणि महत्त्वाचं म्हणजे ती कितीही घासली तरीही मळकटच वाटते. किंवा आपल्याला पाहिजे तशी स्वच्छ होत नाही. म्हणूनच आता त्या कॉलरच्या स्वच्छतेसाठी काय उपाय करावा, याची माहिती घेऊया..3 / 5मळालेली काॅलर अगदी स्वच्छ कशी धुवायची याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ upadhyaykitchen या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 5यामध्ये असं सांगितलं आहे की मळालेली कॉलर आधी थोडी गरम पाण्याने ओली करा. त्यानंतर त्यावर तुरटीचा तुकडा थोडा रगडून घासा.5 / 5यानंतर त्यावर साबण लावा आणि पुन्हा थोडं गरम पाणी टाका. आता ब्रशने घासून पाहा. काॅलरचा मळकटपणा जाऊन ती स्वच्छ झालेली जाणवेल.