साबण, डिशवॉश न वापरताही भांडी होतील चकाचक, बघा भांडी घासण्याच्या ६ खास टिप्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2023 1:50 PM 1 / 8१. भांडी घासायची म्हणजे साबण, डिशवॉश यापैकी काहीतरी लागणारच. पण कधी कधी असंही होतं की नेमकं घरातलं डिशवॉश लिक्विड संपून जातं. भांड्याची साबणही घरात नसते. 2 / 8२. अशावेळी दुकानात जाण्याचा कंटाळा आला किंवा दुकानात लगेचच जाणं शक्य नसेल, तर भांडी घासण्यासाठी हे काही उपाय करून बघा.3 / 8३. भांड्यावर गरम पाणी टाका. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. २ ते ३ मिनिटे भांडी तशीच राहू द्या. त्यानंतर पुन्हा भांड्यावर थोडं गरम पाणी टाका आणि घासणीने भांडी घासून धुवून घ्या. भांडी स्वच्छ होतील.4 / 8४. १ कप गरम पाणी घ्या, त्यात २ टेबलस्पून मीठ आणि १ अख्खं लिंबू पिळा. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. खरकट्या भांड्यांवर हे पाणी टाका आणि घासणीने घासून घ्या. खरकट्या भांड्यांचा चिकट- तेलकटपणा निघून जाईल आणि लिंबामुळे वासही येणार नाही.5 / 8५. तांदळाच्या पाण्याचा उपयोगही भांडी घासण्यासाठी होऊ शकतो. तांदळाच्या पाण्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून भांडी धुण्यासाठी वापरा.6 / 8६. चिंच आणि मीठ यांचा एकत्रित वापर करूनही भांडी घासता येतात. यासाठी चिंच एका पातेल्यात पाणी टाकून उकळून घ्या. १ वाटी चिंचेचा कोळ असेल तर त्यात ३ टेबलस्पून मीठ घाला. या मिश्रणाने भांडी घासा.7 / 8७. १ कप पाणी घ्या. त्यात ४ ते ५ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या आणि भांडी घासण्यासाठी डिशवॉशप्रमाणे वापरा.8 / 8८. बेकिंग सोडा आणि लिंबू यांच्या मिश्रणानेही भांडी अतिशय स्वच्छ होतात. त्यासाठी एका वाटीत ३ टेबलस्पून बेकिंग सोडा घ्या. त्यात १ लिंबू पिळा आणि हे मिश्रण भांडी घासण्यासाठी वापरा. आणखी वाचा Subscribe to Notifications