पाण्याची टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक; १ प्लास्टीकची बॉटल घ्या-आत न शिरता स्वच्छ होईल टाकी Published:February 1, 2024 05:59 PM 2024-02-01T17:59:18+5:30 2024-02-01T18:24:59+5:30
How to Clean Water Tank At Home : सगळ्यात आधी टाकीतलं पाणी खाली करून पूर्ण रिकामी करून घ्या. घराची साफसफाई करताना आपण घरातंल प्रत्येक लहान मोठं सामान स्वच्छ करतो आणि त्याची जागाही बदलतो. घराची साफसफाई करताना आपण घरातंल प्रत्येक लहान मोठं सामान स्वच्छ करतो आणि त्याची जागाही बदलतो. (How to Clean Water Tank At Home) पण पाण्याची टाकी साफ करायची म्हणलं की टेंशन येतं. (How To Clean Water Tank Easily)
वर्षानुवर्ष टाकी साफच होत नाही आणि पाण्यातून दुर्गंध येऊ लागतो. (Easy Steps To Clean Water Tank At Home) नकळत आरोग्याचे विकारही उद्भवतात. टाकीची साफसफाई करताना लोक खूप विचार करतात किंवा बाहेरून कामगार बोलावून टाकी स्वच्छ करून घेतात.
घरातल्या टाकीचं पाणी भांडी धुणं, अंघोळ करणं,कपडे धुण या कामांसाठी लागतं. दुषित पाण्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. अशात पाच ते सहा महिन्यांनी टाकी साफ करणं महत्वाचे आहे. पण तुम्हाला टेंशन घेण्याची काही गरज नाही. काही सोपे हॅक्स तुमचं काम सोपं करू शकता.
टाकी साफ करण्याची सोपी पद्धत कोणती
सगळ्यात आधी टाकीतलं पाणी खाली करून पूर्ण रिकामी करून घ्या. टाकी साफ करण्यासाठी सगळ्यात आधी प्लास्टिकची बॉटल मधोमध कापून घ्या. नंतर फुलाच्या आकारात कैचीने कापा.
त्यानंतर बॉटलचे झाकण उघडून त्यात एक लांब काठी अडकवा. कैचीने कापलेला भाग आत घालून टाकी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.
परत टाकीत पाणी घालून पाण्याने स्वच्छ धुवा.टाकी साफ करण्यासाठी त्यात बेकींग सोडा आणि व्हिनेगरचं मिश्रण तयार करावं लागेल.
सगळ्यात आधी एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात व्हिनेगर, बेकिंग सोडा मिसळा. नंतर हे मिश्रण टाकीत घालून कापडाच्या मदतीने स्वच्छ करा.