किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

Published:April 7, 2023 01:51 PM2023-04-07T13:51:24+5:302023-04-07T14:54:08+5:30

How to Get Rid of Cockroaches : झुरळांपासून सुटका बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध असली तरी रसायने असलेली ही उत्पादने आरोग्यासाठी हानिकारक असतात.

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

किचन कितीही आवरलं तरी घरात पसारा दिसतोस. खरकटी भांडी, अन्नाचे कण यांमुळे किचनमध्ये झुरळांचा वावर वाढतो. एकदा झुरळं वाढले की ते कमी करणंही कठीण होतं. झुरळांना कायमचं घालवण्यासाठी काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (5 effective remedies that prevent cockroaches in kitchen)

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

झुरळांपासून सुटका बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध असली तरी रसायने असलेली ही उत्पादने आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही त्यांना घरबसल्या सहज दूर करू शकता.

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

कडुलिंबाच्या वासानं फक्त कॉकरॉच नाही तर किडेसुद्धा लांब राहतात. यासाठी कडुलिंबाच्या तेलात कापूस बूडवून ज्या ठिकाणी कॉकरॉच दिसतात त्या ठिकाणी ठेवा. याव्यतिरिक्त तुम्ही कडुलिंबाची पावडर पाण्यात मिसळून स्प्रे तयार करू शकता. हे दोन्ही उपाय झुरळांना घालवण्यासाठी प्रभावी ठरतील.

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

तमालपत्राचा स्वयंपाकात पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. सगळ्यात आधी या पानांची पावडर तयार करा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळांचा वापर खूप जास्त आहे. दुसरा उपाय म्हणजे तेजपत्ता पाण्यात उकळवून घ्या आणि स्प्रे बॉटलममध्ये भरून फवारणी करा.

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

घरातील झुरळं खूप जास्त झाली तर ते रोखण्यासाठी पेपरमिंट तेलही खूप फायदेशीर आहे. या तेलाला पाण्यात मिसळून जागोजागी फवारणी करा. काहीवेळानंतर तुम्हाला झुरळं कमी झालेले दिसून येतील.

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माउथवॉश हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी देखील माउथवॉश आणि पाणी समप्रमाणात मिसळून झुरळ लपण्याच्या ठिकाणी फवारावे.

किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय

कॉफी पावडरचा वास आणि त्यात असलेले कॅफिन या दोन्हींमुळे झुरळं मरतात. यासाठी कॉफी पावडर कापडात गुंडाळून त्याची छोटी पुडी बनवा. ते किचन, हॉल, स्टोआररूमच्या कोपऱ्यात ठेवा. झुरळे बाहेर येताच ते नष्ट होतील.