घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 9:08 AM 1 / 10पावसाळ्याच्या दिवसांत घरात जरा जास्तच माशा, चिलटं, डास, पाली, झुरळं होत असतात. ते घालविण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची ही खास माहिती एकदा बघाच.. (how to get rid of insects from home?)2 / 10प्रत्येक घरासाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती dadecordiaries and acookingdiaries या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये नेमके कोणते उपाय सांगितले आहेत ते आता पाहूया... (best home hacks to keep away mosquito, houseflies, cockroaches, insects from house)3 / 10फळांच्या टोपलीभोवती नेहमीच चिलटं फिरताना दिसतात. त्यासाठी फळांच्या टोपलीला व्हिनेगर लावून ठेवा. चिलटं येणार नाही. 4 / 10मिरेपूड आणि पाणी यांचे मिश्रण तयार करून घराच्या भिंतींवर शिंपडा. पाली येणार नाहीत. 5 / 10एक चमचा बेकिंग सोडा एका वाटीमध्ये घाला आणि ती वाटी फ्रिजमध्ये उघडी ठेवा. यामुळे फ्रिजमध्ये कुबट वास येणार नाही. 6 / 10घरामध्ये कापूर जाळल्याने माशा होणार नाहीत. 7 / 10घरात जर खूप डास झाले असतील तर कडुलिंबाची वाळलेली पाने आणि कापुर एकत्र करून जाळा आणि त्याचा धूर घरभर फिरवा. यामुळे घरातले डास निघून जातील.8 / 10पाण्यामध्ये थोडं मीठ मिसळून ते पाणी घरातल्या भिंतींच्या कोपऱ्यांवर शिंपडा. कोपऱ्यांमध्ये जाळे होणार नाहीत. 9 / 10घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर त्यांच्यावर चिमूटभर हळद किंवा हळदीचं पाणी टाका. लाल मुंग्या गायब होतील.10 / 10पाण्यामध्ये दालचिनी, तेजपान टाका आणि त्यात थोडी बोरिक पावडर घाला. हे मिश्रण घरामध्ये फवारा. यामुळे घरात झुरळं होणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications