उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

Published:February 24, 2023 12:04 PM2023-02-24T12:04:42+5:302023-02-24T12:14:33+5:30

Tips to get rid of mosquitoes inside the house डास पळवून लावण्यासाठी ७ घरगुती सोप्या ट्रिक्स..

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

उन्हाळा काही दिवसात सुरु होईल. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या, शारीरिक समस्या, मुख्य म्हणजे मच्छरच्या समस्येमुळे लोकं हैराण होतात. मच्छर चावल्यामुळे लोकांना विविध आजार उद्भवतात. सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डास सर्वत्र पसरतात. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

आपण डास पळवून लावण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतो. यासह बाजारात मिळणाऱ्या क्रिम्सचाही वापर करतो. मात्र, काहीवेळेला हे उपाय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आपण घरगुती उपायांनी देखील डास पळवून लावू शकता. या काही सोप्या ट्रिक्समुळे घरात मच्छरांचा वावर पुन्हा होणार नाही.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. यासाठी लसणाच्या कळ्या स्मॅश करा व पाण्यात उकळा. आता हे पाणी स्प्रे बाटलीत भरा व खोलीवर सर्वत्र शिंपडा. खोलीत उपस्थित असलेले सर्व डास पळून जातील.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

डासांना पळवून लावण्यासाठी कडूनिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूनिंबाचे तेल समप्रमाणात घ्या. आता हे तेल मिक्स करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम ८ तास राहतो.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

लव्हेंडरचा सुगंध खूप तेज असतो. ज्यामुळे घरात डास फिरकत नाहीत. यासाठी घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनर वापरा.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

घरात मच्छर झाल्यावर आपण घरात कॉईलचा वापर करतो. मात्र, कॉईलचा वापर न करता, घरात कापूर जाळा. १५-२० मिनिटे त्याचा धूर होऊ द्या. धुरामुळे डास दूर पळून जातील.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

पुदिन्याच्या वासाने डासांना त्रास होतो. घरामध्ये सर्वत्र पुदिन्याचे तेल शिंपडा. डास तुमच्या घरापासून दूर राहतील.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

सोयाबीन तेल देखील डासांना तुमच्यापासून दूर ठेवते. यासाठी रात्री अंगावर तेल लावून झोपा. असे केल्याने रात्री डास चावणार नाहीत.

उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी

निलगिरीचे तेल डासांपासून दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करा, व शरीरावर लावा. त्यामुळे मच्छर आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.