Join us   

कितीही आवरलं तरी घरातला पसारा कमी होतच नाही? ४ गोष्टी करा, घर नेहमीच राहील टापटीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 3:21 PM

1 / 6
बहुसंख्य लोकांच्या घरात नेहमीच असं होत असतं की घरातली एक व्यक्ती म्हणजेच त्या घरातली स्त्री नेहमीच घर टापटीप ठेवण्याचा, आवरण्याचा प्रयत्न करते. पण घरातले लोक तिला साथ देत नाही. हाताला येतील तिथे वस्तू टाकून देतात. त्यामुळे मग घरभर पसारा होतो. (how to keep your home always neat and clean?)
2 / 6
हा पसारा कितीही आवरला तरी तो कमी होत नाही. कारण पसारा करणाऱ्या व्यक्ती अनेक असतात आणि आवरणारी व्यक्ती एकच असते. त्यामुळे घर नेहमीच अस्ताव्यस्त, पसाऱ्याने भरलेलं दिसतं. अशावेळी एखादा पाहुणा घरी आलाच, तर मग विचारायलाच नको (How can I make my house look neat and clean?). म्हणूनच असं होऊ नये आणि कमीतकमी मेहनतीत तुमचं घर अगदी स्वच्छ, टापटीप दिसावं यासाठी या काही गोष्टी करा. घरात पसारा होणारच नाही. (Helpful Tips to Keep a Home Clean and Tidy)
3 / 6
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर चपलांचा खूप पसारा होतो. त्यासाठी एक मोठं रॅक आणा ज्याला दरवाजे असतील. बऱ्याचदा असं होतं की रॅक छोटं पडतं. त्यामुळे मग त्याच्यात चपला ठेवण्याचा अनेकांना कंटाळा येतो. म्हणूनच ते आत न ठेवता बाहेरच चपला सोडतात. त्यामुळे रॅक मोठ्या आकाराचं आणि सुटसुटीत घ्या.
4 / 6
बेडरुममध्ये नेहमीच खूप पसारा होतो. अशावेळी तिने एक मोठं लॉण्ड्रीबिन आणून ठेवा. ते असं आणा की त्याच्या आतला पसारा बाहेरून दिसणार नाही. ज्या वस्तू जागच्या जागी ठेवणं शक्य होत नाही त्या वस्तू त्या बिनमध्ये सर्रास टाकून देण्याची सूचना घरातल्यांना द्या. यामुळे खोलीत जिकडेतिकडे पसारा दिसणार नाही. हे बिन तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आवरून ठेवू शकता.
5 / 6
कपाटांमध्ये कपड्यांचा पसारा होऊ नये म्हणून ऑर्गनायझर आणा. ते तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता. घरातल्या प्रत्येकासाठी प्रत्येक प्रकारच्या कपड्यांना एक स्वतंत्र ऑर्गनायझर आणलं की कपाट सुटसुटीत दिसेल. ते उघडताच आतून कपडे लोंबकळत बाहेर येणार नाहीत.
6 / 6
चाव्या, रिमोट अशा वस्तू ठेवण्यासाठी हॉलमध्ये एखादं आकर्षक पॉट खरेदी करा. जेणेकरून चाव्या, रिमोट जागच्या जागी राहतील. हे काही उपाय सुरुवातीला करून पाहा. घर स्वच्छ, टापटीप राहण्यास नक्कीच मदत होईल.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी