How to Make Clothes Smell Good : कुबट वास येऊ नये म्हणून कपडे धुताना ५ वस्तू वापरा; कपड्यांना नेहमी येईल सुंगध Published:August 21, 2022 02:21 PM 2022-08-21T14:21:39+5:30 2022-08-21T14:42:51+5:30
How to Make Clothes Smell Good : कपड्यांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही सुगंधी साबण वापरू शकता. कपड्यांना दुर्गंधींमुक्त बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मशीनमध्ये थोडासा साबण ठेवावा लागेल. कपडे धुताना प्रत्येकजण डिटर्जंट वापरतो. पण असे असूनही अनेक वेळा कपड्यांना दुर्गंधी येते. वास्तविक डिटर्जंट कपडे स्वच्छ करतो पण सुगंध देऊ शकत नाही. अशा स्थितीत कपडे धुतल्यानंतरही त्यातून वेगळाच वास येतो. कपडे धुतल्यानंतर सुगंधित राहण्यासाठी पाच सोप्या टिप्स पाहूया. (Five things to use while washing clothes to make fragrant)
परफ्यूमचा वापर
प्रत्येकाच्या घरात परफ्यूम असतातच. कपड्यांना सुगंधित बनवण्यासाठी परफ्यूमचा वापर करता येतो. वॉशिंग मशिनमध्ये कपडे टाकल्यानंतर तुम्ही त्यात परफ्यूम टाका. किती परफ्यूम लावायचे हे तुमच्या परफ्यूमचा वास आणि कपड्याच्या संख्येवर अवलंबून असते. या युक्तीच्या मदतीने सर्व कपड्यांमधून हळूहळू सुंगध येतो.
कॉफी बीन्स
कॉफी बीन्समुळे तुमच्या कपड्यांना कुबट वास येत नाही. यासाठी फक्त कॉफी बीन्स मशीनमध्ये ठेवायचे आहे. 4 ते 5 कॉफी बीन्समुळे तुमच्या संपूर्ण कपड्यांचा वास चांगला येईल. कॉफी पाण्यात घालताना आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॉफी घालणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सुगंधित साबण
कपड्यांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही सुगंधी साबण वापरू शकता. कपड्यांना दुर्गंधींमुक्त बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मशीनमध्ये थोडासा साबण ठेवावा लागेल. कमीतकमी 10 मिनिटे मशीनमध्ये कपडे फिरवले पाहिजेत. ही युक्ती अवलंबल्यानंतर जेव्हाही तुम्ही कपडे वापराल तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला वास नक्कीच येईल.
बेकींग सोडा
अनेक वेळा घाणीमुळे कपड्यांमध्ये दुर्गंधीही येते. अशावेळी कपडे धुताना बेकिंग सोडा वापरता येतो. 1 चमचा बेकिंग सोडा तुमच्या कपड्यांमधली घाण तर दूर करेलच पण वासापासूनही वाचवेल.
पुदिन्याची पानं
अनेक घरगुती कारणांसाठी वापरला जाणारा पुदीना देखील कपड्यांना दुर्गंधीयुक्त बनवू शकतो. कपडे धुताना तुम्हाला फक्त 1 कप पुदिन्याची पाने पाण्यात टाकायची आहेत. यामुळे कपड्यांचा वास नाहीसा होईल. तसेच, कपडे धुतल्यानंतरही तुम्ही पुदिन्याची पानं कपाटात ठेवू शकता. यामुळे कपड्यांवर किटक येत नाही.