फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

Published:July 9, 2024 12:07 PM2024-07-09T12:07:14+5:302024-07-09T12:22:04+5:30

How to Organize a Fridge the Right Way : Fridge Organization Ideas : फ्रिजमध्ये सगळ्या वस्तू स्टोअर करून ठेवल्याने जागाच रिकामी नाही, पाहा फ्रिज नीटनेटका लावण्याची एक सोपी युक्ती..

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

फ्रिज पदार्थांनी खच्चून भरलेला आहे एखादी छोटीशी वस्तू ठेवायला देखील जागा नाही. हा प्रत्येक गृहिणीचा एक मोठा कॉमन प्रोब्लेम आहे. काहीवेळा आपल्याकडून फ्रिजमध्ये बऱ्याच वस्तू ठेवल्या जातात. कधी जास्तीचे अन्न उरले तर ते फ्रिजमध्ये ठेवले जाते, याचबरोबर काहीवेळा आठवडाभराचा भाजीपाला एकदमच विकत आणला तर तो देखील आपण फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. अशावेळी नेमके काय करावे हे समजत नाही. त्यामुळे कितीही मोठा फ्रिज घेतला किंवा त्यातील वस्तू व्यवस्थित लावून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही फ्रिजमधील जागा आपल्याला कमीच पडते. अशावेळी आपण काही सोप्या टिप्सचा वापर करून फ्रिजमधील वस्तू नीट लावून ठेवल्या तर फ्रिजमध्ये वस्तूंची गर्दी होत नाही. त्याचबरोबर कुठे काय ठेवले आहे हे शोधत बसण्यात वेळ जात नाही. त्यामुळे फ्रिज कसे व्यवस्थित लावावे याच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(Best Way To Organize a Fridge).

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

१. भाज्यांना स्टोअर करून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक किंवा काचेच्या आकाराने उभ्या असणाऱ्या डब्यांचा वापर करावा. यामुळे डब्यांत कुठली भाजी आहे हे लगेच दिसून येते. तसेच दाब उभा असल्याने जागा देखील कमी लागते. आपण जुन्या आईस्क्रीमच्या डब्यांचा वापर करु शकतो. तसेच हे डबे एकावर एक असे आपण स्टोअर करून ठेवू शकतो त्यामुळे जागा कमी लागते.

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

२. उरलेले अन्नपदार्थ स्टीलच्या पारदर्शक झाकणी असलेल्या डब्यात ठेवावेत. हे डबे फ्रिजमध्ये मागे न ठेवता पुढे ठेवावेत. जेणेकरून हे उरलेले अन्नपदार्थ लवकरात लवकर संपवण्याची आठवण राहते.

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

३. दुधाचे मोठे टोप फ्रिजमध्ये स्टोअर करून जास्त जागा अडवू नये. याऐवजी आपण दूध स्टोअर करून ठेवण्याचे उभे स्टीलचे भांडे विकत मिळते त्याचा वापर करू शकता. यामुळे फ्रिजमध्ये जास्त जागा अडून राहत नाही.

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

४. आपल्याला पुढील २ ते ३ दिवसांत लागणाऱ्या भाज्या चिरून डब्यात भरून ठेवाव्यात. जेणेकरुन स्वयंपाक बनवायला फारसा वेळ लागणार नाही. तसेच भाज्या आहे तशाच स्टोअर केल्या तर जास्त जागा लागते. याउलट जर भाज्या चिरुन स्टोअर करून ठेवल्या तर तेवढीच कमी जागा लागते.

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

५. फ्रिजमध्ये सर्वात खाली असणाऱ्या व्हेजिटेबल बास्केटमध्ये जागा फारच कमी असते. त्यामुळे यात एकाचवेळी फळे आणि भाज्या स्टोअर करणे कठीण जाते. त्यामुळे या व्हेजिटेबल बॉक्समध्ये लहान बास्केट मध्ये फळे आणि भाजीपाला ठेवणे टाळा. याउलट आपण फळे आणि भाजीपाला कॉटनच्या नॅपकिनमध्ये बांधून व्हेजिटेबल बॉक्समध्ये स्टोअर करुन ठेवल्यास जागा कमी लागते.

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...

६. फ्रिजमध्ये एकाचवेळी एकदम फळे किंवा भाजीपाला आणून स्टोअर करुन ठेवू नका. यामुळे जागा अडून तर राहतेच शिवाय हे नाशवंत अन्नपदार्थ असल्याने ते लवकर खराब देखील होऊ शकतात. यामुळे शक्यतो फळे व भाजीपाला लागतील तसे नेहमी फ्रेश आणावेत.