1 / 5बऱ्याचदा असं होतं की मुलांच्या शाळेच्या ड्रेसवर किंवा नवऱ्याच्या ऑफिसच्या पांढऱ्याशुभ्र किंवा एखाद्या फिक्या रंगाच्या शर्टवर शाईचे काळे- निळे डाग पडतात.2 / 5आपण एरवी जसे कपडे धुतो तसे हे डाग धुतले तर ते अजिबात निघत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा मग असे शाईचे डाग पडलेले कपडे टाकून द्यावे लागतात.3 / 5त्यामुळेच हा उपाय आता लगेच पाहून घ्या आणि हा उपाय करून कपड्यांवर पडलेले शाईचे डाग काढा.. हा उपाय sharuldiwan या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 5 हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी कपड्यावर ज्या ठिकाणी डाग पडले आहेत तो भाग थोडा पसरवून ठेवा आणि त्यावर डेटॉल टाका.5 / 5७ ते ८ मिनिटांनंतर त्यावर थोडं पाणी टाका आणि मग हाताने चोळून डाग काढण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर स्वच्छ पाण्यात तो कपडा बुडवा. डाग बऱ्यापैकी निघून गेलेले असतील. जर डाग खूप पक्का असेल तर हा उपाय पुन्हा एकदा करा.त्यानंतर मग डाग निघालेला कपडा नेहमीप्रमाणे धुवून घ्या.