how to remove oil stains from clothes, best home remedies to remove oil stains from cloth
पणत्या लावताना कपड्यावर तेल सांडलं तर चिमूटभर मीठ घेऊन 'हा' उपाय करा, डाग पडणार नाहीत...Published:October 26, 2024 09:15 AM2024-10-26T09:15:22+5:302024-10-26T09:20:02+5:30Join usJoin usNext दिवाळी हा दिव्यांचा उत्सव (Diwali Celebration 2024). त्यामुळे हा उत्सव जोरदार साजरा व्हावा, यासाठी आपण आपल्या घरासमोर, अंगणात, बाल्कनीमध्ये शक्य तेवढ्या पणत्या लावतो आणि वातावरण प्रसन्न- मंगलमय करतो. आता पणत्या लावताना, त्यात तेल टाकताना किंवा पणती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवताना थोडी धावपळ होते, गडबड होते आणि मग त्यातलं तेल कपड्यांवर सांगतं. दिवाळी म्हटल्यावर साहजिकच आपल्या अंगात नवेकोरे, भरजरी कपडे असतात. त्यावर तेल सांडलं की मग एकदम नव्या कपड्यांवर तेलाचे डाग पडण्याचं टेन्शन येतं. म्हणूनच अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त हा एक सोपा उपाय पाहून ठेवा.. एका वाटीमध्ये १ चमचा मीठ घ्या. त्यामध्ये २ टेबलस्पून कोणतंही डिशवॉश लिक्विड टाका. हे मिश्रण एकत्रित करा आणि जिथे डाग पडला आहे, त्यावर लावून जुन्या टुथब्रशने घासून काढा. त्यानंतर कोमट पाण्याने तेवढी जागा धुवून टाका. डाग पुर्णपणे निघून जातील. टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीCleaning tipsHome remedy