पणत्या लावताना कपड्यावर तेल सांडलं तर चिमूटभर मीठ घेऊन 'हा' उपाय करा, डाग पडणार नाहीत... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 9:15 AM 1 / 5दिवाळी हा दिव्यांचा उत्सव (Diwali Celebration 2024). त्यामुळे हा उत्सव जोरदार साजरा व्हावा, यासाठी आपण आपल्या घरासमोर, अंगणात, बाल्कनीमध्ये शक्य तेवढ्या पणत्या लावतो आणि वातावरण प्रसन्न- मंगलमय करतो. 2 / 5आता पणत्या लावताना, त्यात तेल टाकताना किंवा पणती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवताना थोडी धावपळ होते, गडबड होते आणि मग त्यातलं तेल कपड्यांवर सांगतं.3 / 5दिवाळी म्हटल्यावर साहजिकच आपल्या अंगात नवेकोरे, भरजरी कपडे असतात. त्यावर तेल सांडलं की मग एकदम नव्या कपड्यांवर तेलाचे डाग पडण्याचं टेन्शन येतं. म्हणूनच अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त हा एक सोपा उपाय पाहून ठेवा..4 / 5एका वाटीमध्ये १ चमचा मीठ घ्या. त्यामध्ये २ टेबलस्पून कोणतंही डिशवॉश लिक्विड टाका. हे मिश्रण एकत्रित करा आणि जिथे डाग पडला आहे, त्यावर लावून जुन्या टुथब्रशने घासून काढा.5 / 5त्यानंतर कोमट पाण्याने तेवढी जागा धुवून टाका. डाग पुर्णपणे निघून जातील. आणखी वाचा Subscribe to Notifications