कपड्यांवर तेलाचे-हळदीचे-चहाचे डाग पडले? घाबरू नका, पाहा कोणता डाग काढण्यासाठी काय करायचं..
Updated:April 12, 2025 16:50 IST2025-04-12T11:54:19+5:302025-04-12T16:50:57+5:30

आपण कितीही काळजी घेतली तरी कपड्यांवर कोणते ना कोणते डाग कधीतरी पडतातच.. हे डाग काढताना मग नाकीनऊ येतात. म्हणूनच आता कोणता डाग काढून टाकण्यासाठी काय वापरावं ते पाहा. हे उपाय जर तुम्ही डाग काढून टाकण्यासाठी वापरले तर नक्कीच कमीतकमी मेहनतीत कपडे एकदम स्वच्छ होऊन जातील.
कोणता डाग काढून टाकण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती alshihacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की कपड्यांवर जर कॉफी सांडली असेल तर तो डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी वापरा.
कपड्यांजर जर शाईचे डाग पडले असतील तर अल्कोहोल बेस असणारे हॅण्ड सॅनिटायझर वापरावे.
कपड्यांवर जर हळदीचे डाग पडले असतील तर त्या डागांवर थोडा लिंबाचा रस लावा आणि तो कपडा काही वेळ उन्हात ठेवा. त्यानंतर साबण लावून धुतल्यास डाग निघून जातील.
उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येतो. यामुळे काखेच्या भागात घामाचे पिवळसर, काळसर डाग पडतात. पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे असतील तर ते डाग थोडे जास्तच उठून दिसतात. ते काढून टाकण्यासाठी व्हाईट व्हिनेगर वापरावे.
कपड्यावर तेलाचे डाग पडले असतील तर त्यावर काही वेळासाठी कॉर्नस्टार्च लावून ठेवावं. त्यानंतर साबण किंवा डिटर्जंट वापरून थोडं घासलं की डाग पुर्णपणे निघून जातील.
कपड्यावर जर पेंटचे डाग पडले असतील तर त्यावर थोडंसं अल्कोहोल टाका. डाग निघून जातील.
वरण, भाजी असे पदार्थ जर कपड्यांवर सांडले असतील तर ते आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्यावर डिशवॉश लिक्विड आणि हायड्रोजन पेरोक्झाईड घाला. यामुळे डाग अगदी स्वच्छ होतील.