1 / 6ज्या घरात शाळा, कॉलेजमध्ये जाणारी लहान मुलं असतात, त्या घरात नेहमीच वापरून झालेले पेन इकडे- तिकडे पडलेले दिसतात. असा एखादा जरी पेन तुमच्या घरात असेल तर त्याचा खूपच छान पद्धतीने वापर करता येतो.(how to reuse leftover waste pen?)2 / 6टाकाऊ किंवा रिफिल संपलेल्या पेनापासून सुंदर, आकर्षक हेअरस्टीक कशा तयार करायच्या, ते आता पाहूया...(home hacks for making attractive hair stick)3 / 6त्यासाठी सगळ्यात आधी तर जो पेन असेल त्याला फेव्हिकॉल लावून त्यावर एखादी छानशी लेस गुंडाळून घ्या. लेसच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळ्या ॲक्रॅलिक रंगांचा वापरही करू शकता. हवे ते ॲक्रॅलिक रंग वापरून पेनावर नाजूक नक्षी काढा.4 / 6त्यानंतर पेनाच्या एका टोकावर बाजारात मिळणारे असे छोटेसे लटकन लावा. तुमच्याकडच्या एखाद्या जुन्या कानातल्याचा वापरही तुम्ही त्यासाठी करू शकता.5 / 6किंवा लटकनऐवजी असं एखादं फुल लावलं तरी चालेल. त्यामुळेही हेअरस्टीकला खूप छान लूक येईल.6 / 6अशा पद्धतीने टाकाऊ पेनाचा हेअर स्टीकच्या रुपात खूप चांगला आणि देखणा उपयोग करता येईल.