कांदे - बटाटे ठेवण्याची जाळीदार 'मॅश बॅग' फेकू नका, पाहा तिचा पुन्हा वापर करण्याची झटपट युक्ती...
Updated:January 15, 2025 18:30 IST2025-01-15T18:03:40+5:302025-01-15T18:30:36+5:30
How To Reuse Mesh Bag In Kitchen : 8 Different Ways To Reuse Your Mesh Bags : How to reuse the mesh vegetable bags : 8 ways to reuse mesh bag : 'मॅश बॅगे' चा नेमका कसा आणि कोणकोणत्या कामांसाठी वापर करु शकतो, ते पाहा...

बरेचदा आपण कांदे - बटाटे विकत घेताना ते एका (How To Reuse Mesh Bag In Kitchen) विशिष्ट प्रकारच्या जाळीदार पिशवीत स्टोअर करून विकले जातात. या जाळीदार पिशवीला 'मॅश बॅग' (8 Different Ways To Reuse Your Mesh Bags) असे म्हटले जाते. शक्यतो, कांदे - बटाटे विकत आणल्यानंतर ही जाळीदार 'मॅश बॅग' आपण फेकून देतो. परंतु ही 'मॅश बॅग' फेकून न देता आपण त्याचा किचनमधील अनेक काम करण्यासाठी अगदी सहज उपयोग करून घेऊ शकतो. या 'मॅश बॅगे' चा नेमका कसा आणि कोणकोणत्या कामांसाठी वापर करु शकतो ते पाहा.
१. भाजीपाला - फळ करा स्टोअर :-
कांदे - बटाटे विकत आणल्यानंतर, ही जाळीदार 'मॅश बॅग' फेकून देण्याऐवजी आपण त्यात भाजीपाला - फळ भरुन स्टोअर करून ठेवू शकतो. या 'मॅश बॅग' किचनमध्ये हुकवर टांगल्याने भाजी व्यवस्थित राहतेच, पण स्वयंपाकघरातील जागाही वाचते.
२. स्क्रबर होल्डर :-
किचन सिंकजवळ या जाळीदार 'मॅश बॅग' आपण लटकवून ठेवू शकता. यात आपण भांडी घासण्याचा ओला स्पंज किंवा स्क्रबर ठेवू शकता. याला जाळी असल्याने ओला स्पंज किंवा स्क्रबर लगेच वाळून कोरडे होतील. याचबरोबर, स्पंज, स्क्रबरमधील पाणी निथळून जाण्यास मदत होईल.
३. कंपोस्ट खतं तयार करण्यासाठी :-
स्वयंपाकघरातील कचरा जसे की फळे आणि भाजीपाल्याची सालं गोळा करण्यासाठी या जाळीच्या पिशव्या वापरल्या जाऊ शकतात. जर आपल्याला बागेसाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी फळे आणि भाजीपाल्याची सालं साठवायची असतील तर आपण या मॅश बॅगेचा वापर करु शकता.
४. फूड स्ट्रेनर बनवा :-
पालेभाज्या धुणे किंवा डाळी, कडधान्य स्वच्छ धुवून निथळत ठेवण्यासाठी देखील तुम्ही या पिशव्यांचा वापर करु शकता.
५. साबण आणि डिटर्जंट ठेवण्यासाठी :-
जर तुम्हाला साबणाच्या वड्या किंवा डिटर्जंट पावडर कोरडी स्टोअर करून ठेवायची असेल तर या 'मॅश बॅग' उपयोगी येतील. यासोबतच ओला साबण सुकवण्यासाठी आणि त्यातील पाणी निथळून जाण्यासाठी या पिशव्यांचा वापर करु शकता.
६. स्क्रबर म्हणून वापरा :-
या जाळीच्या 'मॅश बॅग' गोळा करून तुम्ही डिशवॉशिंग स्क्रबर देखील तयार करु शकता. स्टील स्क्रबर ने नॉन-स्टिक पॅन किंवा भांडी घासल्याने त्यावर चरे पडून खराब होतात, असे होऊ नये म्हणून तुम्ही या जाळीच्या पिशव्यांचा वापर करु शकता.
७. भांडी स्टोअर करून ठेवण्यासाठी :-
या जाळीदार मॅश बॅगेत आपण रोजच्या वापरातील न लागणाऱ्या किचनमधील वस्तू स्टोअर करून ठेवू शकतो. चमचे, वाट्या, छोट्या डिश अशा अनेक वस्तू स्टोअर करून ठेवू शकतो.
८. कडीपत्ता - पुदिना स्टोअर करा :-
या जाळीदार मॅश बॅगेतून हवा आत बाहेर जाऊन खेळती राहते. यामुळे आपण यात कडीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, तुळस देशील यात स्टोअर करून ठेवू शकता. यामुळे कडीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, तुळस खराब न होता दीर्घकाळ चांगले राहण्यास अधिक मदत होते.