गणपतीचं निर्माल्य फेकू नका, वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा खास वापर करा- बघा सोपे उपाय

Published:September 14, 2024 04:26 PM2024-09-14T16:26:22+5:302024-09-14T16:34:07+5:30

गणपतीचं निर्माल्य फेकू नका, वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा खास वापर करा- बघा सोपे उपाय

१० दिवस गणराज घरी विराजमान होतात आणि त्यानंतर मग आपण त्यांचे विसर्जन करतो. गणरायाचे विसर्जन तर होऊन जाते, पण त्याला १० दिवस आपण जी हार, फुलं किंवा इतर वस्तू अर्पण करतो, त्याचे नंतर काय करावे ते समजत नाही. (Ganapati Festival 2024)

गणपतीला आपण दररोज एखादं जास्वंदाचं फुल तरी वाहताेच. ही सगळी फुलं एकत्र करा आणि त्याचे तुकडे करा. एका पातेल्यात अर्धा लीटर तेल घ्या. त्यात जास्वंदाची फुलं टाका आणि ते तेल हलकसं उकळून घ्या. थंड झाल्यानंतर गाळून घ्या. हे तेल केसांसाठी वापरा. जास्वंदामध्ये असणारे अनेक घटक केसांना उत्तम पोषण देतात.

गणपतीचं निर्माल्य फेकू नका, वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा खास वापर करा- बघा सोपे उपाय

गणपतीच्या निर्माल्यात असणाऱ्या दुर्वा एकदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या थोडं दही घालून मिक्सरमधून वाटून घ्या. ही पेस्ट एका वाटीत काढा. त्यामध्ये थोडा मध, कॉफी. बेसन पीठदेखील घालू शकता. आता हा झाला तुमचा नॅचरल स्क्रब तयार. हा स्क्रब अंगावरचे टॅनिंग, डेडस्किन काढून टाकण्यासाठी वापरू शकता.

गणपतीचं निर्माल्य फेकू नका, वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा खास वापर करा- बघा सोपे उपाय

याशिवाय गणपतीला जी वेगवेगळी फुलं, विड्याची पानं अर्पण केली जातात ती उन्हामध्ये थोडी वाळवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करा आणि ती पावडर थोडी थोडी झाडांच्या मातीत टाकून द्या. झाडांसाठी ते नैसर्गिक खत म्हणून उपयुक्त ठरेल.