पंचपाळ्यातले हळदी- कुंकू ओलसर होऊन हळदीत किडे होतात? १ उपाय- त्यांचा रंगही राहील फ्रेश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 9:09 AM 1 / 5बऱ्याचदा असं होतं की पंचपाळ्यामध्ये ठेवलेलं हळदी- कुंकू ओलसर होतं. पावसाळ्यात तर ती अडचण बऱ्याचदा येते.2 / 5त्यामुळे मग हळदी- कुंकवाचा रंगही काही दिवसांत जरा फिका पडल्यासारखा वाटतो. हळद पांढरट रंगाची दिसू लागते. 3 / 5शिवाय बऱ्याचदा तर असंही लक्षात येतं की हळदीमध्ये बारीक काळ्या रंगाचे किडे झाले आहेत. असं झालं तर मग ते हळद- कुंकू आपण टाकून देतो. पण असं करण्यापेक्षा हा एक सोपा उपाय करून पाहा.4 / 5पंचपाळ्यातले किंवा इतर बरणीमध्ये भरून ठेवलेले हळद- कुंकू अधिक दिवस फ्रेश ठेवायचे असेल, त्यात ओलसरपणा येऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी आपण कापूरचा वापर करू शकतो.5 / 5यासाठी कापूराची थोडीशी पावडर करून ती पंचपाळ्यात किंवा हळदी- कुंकू भरून ठेवलेल्या इतर बरणीच्या तळाशी टाकून ठेवा. यामुळे हळदी- कुंकवामध्ये ओलसरपणाही येणार नाही आणि त्यांचा रंग उडून ते फिकेही पडणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications