Join us

पावसाळ्यात बिस्किटं सादळतात, मीठ ओलसर होते? अन्न- धान्य साठवून ठेवण्यासाठी ५ स्मार्ट किचन टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2024 14:36 IST

1 / 7
पावसाळ्यात अन्नधान्य साठवून ठेवताना थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण दमट हवेमुळे स्वयंपाक घरातले अनेक पदार्थ ओलसर होऊन लगेच खराब होतात.
2 / 7
त्यामुळेच या काही किचन टिप्स तुम्हाला पावसाळ्यात अन्न धान्य साठवून ठेवण्यासाठी नक्कीच उपयोगी येतील. या सगळ्या टिप्स dadecordiaries and dacookingdiaries या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.
3 / 7
यामध्ये असं सांगितलं आहे की पेपर नॅपकिनमध्ये थोडे तांदूळ टाकून त्याची घडी घालून तो कॉफीच्या डब्यात टाकून ठेवा. यामुळे कॉफी ओलसर होणार नाही. बोर्नव्हिटा साठवून ठेवण्यासाठीही तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.
4 / 7
बिस्किटांच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवा. बिस्किटं ओलसर होणार नाही. क्रीस्पी राहतील.
5 / 7
डाळी किंवा कडधान्यांच्या डब्यामध्ये तेजपान टाकून ठेवा. खराब होणार नाहीत.
6 / 7
रवा थोडा भाजून घ्या आणि मग थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवा. रव्यामध्ये अळ्या होणार नाहीत. बरेच दिवस चांगला टिकेल.
7 / 7
मसाल्याच्या पाकिटांना रबर लावून पॅक करा आणि नंतर ते फ्रिजमध्ये ठेवा. मसाले चांगले टिकतील.
टॅग्स : किचन टिप्ससुंदर गृहनियोजनमोसमी पाऊसअन्न